💥पालावरच्या वस्तीमधील शाळेत संविधान दिन साजरा....!


💥प्रा.मोनिका प्रसेनजित चिखलीकर यांचा उपक्रम💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-स्थानिक;वाशिम येथे ह्युमन वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रसेनजित चिखलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी प्रा.मोनिका प्रसेनजित चिखलीकर यांचा वाढदिवस व संविधान दिनाचे औचित्य साधून भटक्या विमुक्तांच्या पालावरील वस्ती शाळेत असा आगळा वेगळा वाढदिवस केक कापून साजरा केला.


        वस्ती मधी  शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाटी, पुस्तक, पेन पेन्सिल इतर शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केले. याच कार्यक्रमाची सुरूवात भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून केला.प्रा.मोनिका प्रासेंजित चिखलीकर यांचे सासरे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्मृतीशेष प्रा.डाॅ. सत्यजीत चिखलीकर व पती प्रा. प्रसेनजित चिखलीकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत समाजाच काहीतरी देणं लागत ह्या हेतूने त्यांचा वाढदिवस व संविधान दिन असा दुहेरी संगम लक्षात घेऊन अशा गोरगरीब पालावरील वस्ती शाळेत आपला वाढदिवस साजरा करून त्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.वाशिम येथील शेलु बाजार रोड वरील रेल्वे लाईनच्या लगत पाल टाकून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांची वस्ती आहे.त्यांच्या मुलांसाठी मागील दोन वर्षांपासून संगीता ढोले (महाराष्ट्र पोलिस) ह्या एम.एस.डब्ल्यू. चे उच्च शिक्षण पूर्ण करून वस्ती शाळा चालवतात.त्यांच्या व्यस्त पोलिस सेवेतून रोज वेळ काढून निस्वार्थपणे ह्या गोरगरीब मुलांना शिकविणे व योग्य वळण लावण्याच मोलाचे कार्य अविरतपणेे करीत आहेत.हे भटके विमुक्त एका ठिकाणी वास्तव्य करत नसल्याने व गरीबी,अज्ञान व अंधश्रद्धेमुळे त्यांच्या मुलांचा कुठल्याही शाळेत दाखला नाही.वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संविधानानाचे महत्व मान्यवरांनी समजावून सांगितले. या प्रसंगी श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षातील विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता प्रदिप पट्टेबहादूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  समता, बंधुता, न्याय, हक्क,समता एकात्मता यान संविधानिक मूळ तत्वांची माहिती सागितली  वस्तीमधील शाळेतील एका हुशार विद्यार्थ्याने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.सामाजिक कार्यकर्त्या संगिता चव्हाण व समाजकार्य महाविद्यालयातील त्रिरत्न पाईकराव व ईतर विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी प्रा.मोनिका यांचे वडील अरूण ढापसे,आई अल्का ढापसे व बहीण सोनाली व अंजली उपस्थित होते व उपस्थित सर्व मान्यवरांनी,शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रा.मोनिका चिखलीकर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या व 26 नोव्हेंबर  संविधान दिन साजरा केला.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या