💥परळी शहराची कचराकुंडी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही ; भ्रष्ट नगर परिषद प्रशासनाने नागरिकांचे हाल थांबवावेत...!


💥शहरातील ऐतिहासिक 'अमर मैदान' परिसरातील कचऱ्याचे ढीग त्वरित उचला अन्यथा घंटानाद आंदोलन - प्रा पवन मुंडे

परळी प्रतिनिधी : शहरातील पंचवटी नगर भागातील "अमर मैदान" परिसरात शहरातील सर्व भागातील कचरा आणून टाकला जात असून  त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे  त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक नागरिक डेंगू व मलेरिया सारख्या आजारांना बळी पडत आहेत तरी येणाऱ्या 8 दिवसाच्या आत या कचऱ्याचे ढीग न. प. प्रशासनाने उचलावेत अन्यथा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन नागरपालिके समोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.

शहराच्या स्वच्छतेचे वाटोळे करण्याचा मानस परळी नगरपालिका प्रशासनाचा दिसत असून  शहराच्या मध्यवर्ती भागातील "ऐतिहासिक अमर मैदान"  जिथे  शहरातील प्रत्येक व्यक्ती लहानपणी खेळला आहे, बागडला आहे अशा मैदानाची न प प्रशासनाने मात्र कचरा कुंडी केली असून तिथे परळीतील पूर्ण कचऱ्याचे ढीग आणून टाकले जात आहेत त्या मुळे त्या परिसरातील लोक डेंगू व मलेरिया सारख्या आजारांना बळी पडत असून सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे तरी येत्या 8 दिवसात ते कचऱ्याचे ढीग उचलून घ्यावे अन्यथा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिके समोर घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी लेखी निवेदना द्वारे कळवले आहे.

*********************************************

शहरातील स्वाती नगर भागातील रस्ता पूर्णपणे फोडला असून त्या वर नवीन रस्ता तात्काळ करावा या मागणीसाठी स्वाती नगर येथील नागरिकांनी न प प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे, त्या ही रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा  अशी मागणी प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या