💥बेरोजगार,भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघाच्या परभणी जिल्हा संघटकपदी उत्तमराव जोंधळे यांची निवड....!


💥स्वाभिमानी, स्वयंपुर्ण, सामर्थ्यशाली राष्ट्र उभारणी अभियान राबवणार - उत्तम जोंधळे

पुर्णा(दि.०७ नोव्हेंबर) - पूर्णा येथील विविध सामाजिक  क्षेत्रात सहभाग नोंदवीत कामगारांच्या प्रश्नावर तळमळीने काम करणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मा. उत्तमराव जोंधळे यांची परभणी जिल्हा संघटक  पदी निवडीची शिफारस मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा. विशालजी लोमटे सर,कार्याध्यक्ष मा. उदयजी खरात सर तसेच मराठवाडा विभागीय सरचिटणीस अमोल गुंड साहेब  यांनी केले नुसार संघटनेचे असंघटीत कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. किशोरजी जाधव  सर  यांच्या मान्यतेने  प्रदेश  सरचिटणीस मा.अरविंद भोसले साहेब यांनी सदर निवडीची अधिकृत घोषणा केली.

मा.उत्तमराव जोंधळे  यांची परभणी जिल्हा संघटक पदी निवडीची अधिकृत घोषणा होताच त्यांच्यावर अभिंनंदनाचा वर्षाव सुरु झाला तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. एस्.एन्.ठाकुर सर,महासचिव मा. पंडीतजी कांबळे साहेब,राष्ट्रीय स्टँडींग कमिटीचे चेअरमन तथा धनश्री एज्युकेशन ग्रुपचे मँनेजिंग डायरेक्टर मा.दिपकजी काळे सर,महा. प्रकल्प संचालक मा.अजितजी केळकर सर,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा मा सौ शिलाताई डावरे मॅडम तसेच संघटनेच्या असंघटीत बांधकाम कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.अरविंदजी भोसले सर ,राष्ट्रीय महिला संघटक सचिव मा शारदा शर्मा मॅडम सुशिक्षित बेरोजगार महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा मा. सौ. वनिता कोरटकर मँडम तसेच असंघटीत महिला  कामगार संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षा मा.माधुरी उदावंत मँडम महिला प्रदेश सरचिटणीस मा. गौतमी ओहाळ मँडम, मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष मा ॲड हर्षा आंभोरे तसेच महाराष्ट्र राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी  मा.उत्तमराव जोंधळे  यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजयजी रणदिवे सर यांनी भ्रमनध्वणी वरुन मा. उत्तमराव जोंधळे  यांचे अभिनंदन केले व असंघटीत  क्षेत्रातील कामगारांपर्यत संघटनेची मानवता हा एकच धर्म आणी आर्थिक मागास एकच जात , त्यांचा सर्व पातळीवर सर्वांगीण विकास हाच BBMAK संघाचा ध्यास तसेच बेरोजगार हाताला काम व कामाचा योग्य दाम ,असंघटीत कामारांना हवी आहे सामाजिक सुरक्षा, जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी राज्याच्या शेतीला हवाय उद्योगाचा दर्जा, तसेच महिला भगिनींचे व्हावे सक्षमिकरण व सार्वजनिक ठिकाणी मिळावे संरक्षण,  ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणा-या असंघटीत कामगारांना मिळावी ६००/- रुपये पेन्शन ही संघटनेची विचार धारा सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावी तसेच संविधानाने बहाल केलेले मौलिक अधिकार व कर्तव्य या विषयी जनतेत जागृती निर्माण करुन संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान गतीमान करुन संघटनेच्या सदस्यांना केंद्र सरकारच्या  ई-श्रमिक कार्डचे मोफत वाटप करणेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणेचे आव्हान करुन संघटनेच्या माध्यमातुन जनतेच्या हितासाठी लढा उभा करणे च्या पुढील सामाजिक वाटचालीस पत्रकार, व सामाजिक, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या