💥तोंडूळी येथील अत्याचार पीडित कुटुंबासमवेत आमदार अंबादास दानवे यांनी साजरी केली दिवाळी....!


💥यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना कपडे, दिवाळी फराळ, फळे इतर साहित्य भेट देण्यात आली💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद 3 ऑक्टोबर

मागील ऑक्टोबर महिन्यात पैठण तालुक्यातील तोंडूळी गावातील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढवत  लूटमार करून येथील महिलांवर अत्याचार केला होता. सामाजिक बांधिलकी जपत या प्रसंगातून, दुःखातून कुटुंबाला सावरण्यासाठी आज (दि. 3 ऑक्टोबर) रोजी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे महिला आघाडी व गावकऱ्यांनी या अत्याचार पीडित कुटुंबा समवेत दिवाळी साजरी केली. कुटुंबातील माता भगिनींनी आमदार अंबादास दानवे यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी या कुटुंबातील पुरुष बांधवांना ओवाळून भाऊबीज साजरी यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना कपडे, दिवाळी फराळ, फळे इतर साहित्य भेट देण्यात आली. 

यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवून पिडीत कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून दिला जाईल त्यांचे दुःख भरून न निघण्यास सारखे आहे एक छोटासा प्रयत्न शासनाच्या मनोधैर्य योजनेतुन आर्थिक मदत कुटुंबियांना करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सरपंच सचिन गरड, उपतालुकाप्रमुख मनोज पेरे ,सरपंच संजय गरड ,काशिनाथ गरड, पठाडे मामा , शेकुर पटेल, भारत गरड, अरुण तांबे, काशिनाथ तांबे, एकनाथ मंडलिक, विष्णू शेळके, शमऊद्दीन पठान, गोरख तांबे, अमोल गरड  महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखीताई परदेशी, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, मीना फासाटे,पुष्पाताई गव्हाणे ,ज्योती पठाडे ,सरपंच सारिका पेरे ,संदीप गवांदे ,संजय गुंजाळ ,राजू भवर आदी गावकरी उपस्थित होते...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या