💥पुर्णा तालुक्यात ढगाळ वातावरणाचा परिणाम ; हरभरा पिकावर मर रोग व महावितरणने वीज बंद केल्या मुळे शेतकरी त्रस्त...!



💥हरभरा पिकावर हेलिकोवर्पा अळीचा मोठा प्रादुर्भाव💥

पुर्णा ; सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामाची हरभरा पेरणी यंदा लवकरच झाली परंतु गेल्या महिना भरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे  वातावरण ढगाळ राहत असून याचा परिणाम शेतातील उभ्या पिकावर होत आहे.यंदा पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात खरिपातील सोयाबीन पीका नंतर रब्बीत हरभरा पिकाला पसंती दिल्यामुळे हरभरा मोठ्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी ची लवकर घाई  केल्यामुळे जमिनीत बुरशी वाढली व त्याचा परिणाम हरभरा पीक( मर रोग )  वाळून जात असल्याने मोठे नुकसान होताना दिसत आहे. त्यातच सध्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर हेलीकोवर्पा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने आळी पाने कुरतडून टाकत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

       यंदा शेतकऱ्यांनी खरिपात सोयाबीन व रब्बीत हरभरा पिकाला पसंती देत मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.पेरणी होऊन जवळपास एक महिना लोटला असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे त्यामुळे पाण्याची गरज आहे परंतु महावितरण ने वसुली साठी  वीज पुरवठा बंद करून आदीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज बंद करून कात्रीत पकडले आहे एकीकडे निसर्गाचे संकटाने खरिपातील सोयाबीन गेले तर रब्बी हंगामातील हरभरा रोजच्या ढगाळ वातावरणाने हिरवी अळी व मर रोगामुळे हातचा जाण्याची वेळ आल्याने  शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे महावितरण कंपनी ने तरी माणुसकी दाखवून वीज पुरवठा चालू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

---------------------------------------------------------------------------

उपाययोजना ;-

सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आळी चा कमी प्रादुर्भाव असलेल्या हरभरा पिकावर क्विनाल्फोस- ४०० मिली प्रती एकर तर जास्त प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात इमामेक्तीन बेन्झोइट - ८० ग्राम प्रति एकर फवारणी घ्यावी .

डॉ.गजानन गडदे  

व्यवस्थापक कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या