💥परळी शहरात काँग्रेस आयचे जनजागृती अभियानाला आजपासुन सुरुवात...!


💥खुप झाली महागाई व खोट्या आश्वासनांची मार आता हाकलून लावु मोदी सरकार - सय्यद हनिफ सय्यद करिम

💥हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करुन अभियान मार्गस्थ💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीला जनता हैराण झाली आहे.गॕस दरवाढ,पेट्रोल दरवाढ अदी महागाईमुळे वंचित गोरगरिब जनतेच जिवन जगणे कठिण बनले असुन या हुकुमशाही सरकार विरोधात लोकांची जनजागृती व्हावी या करिता महाराष्ट्र काॕग्रेस आयने संपुर्ण राज्यात  जनजागृती अभियान आज पासुन सुरुवात केली आहे.याच अनुशंगाने परळी काँग्रेसच्या वतिने शहराध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करिम उर्फ बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली शहरात 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.या अभियानाला शहरातुन प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान काँग्रेसच परिपञक वाटप करण्यात आले.


परळी शहर काॕग्रेस भवन येथे आज सकाळी हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती निमित्ताने हजरत टिपु सुलतान यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करुन जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.परळी शहर काँग्रेस कार्यालयापासून ते सुरेश्वर नगर, पदमावती गल्ली व झी कॉर्नरचा परिसर या ठिकाणी ही रॕली काढण्यात आली.परळी शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी, महिला अध्यक्ष, युवक काँग्रेस, सर्व फ्रंट, NSUI, सेवा दल, ओबोसी सेल, अल्पसंख्याक सेल, किसान सेल व अनुसूचित जाती जमाती अदीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

हे जनजागृती अभियान शहरातील 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान गणेशपार ते नांदूरवेस ते नेहरू चौक तळ भाग,स्नेह नगर ते नाथ रोड,टॉवर लाईन मार्केट, किराणा लाईन ते एक मिनार रोड,विद्यानगर परिसर,शिवाजी चौक,टॉवर लाईन मार्केट, किराणा लाईन ते एक मिनार रोड, अदी भागात ही रॕली जाणार असल्याचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी सांगितले या अभियानात शहराध्यक्ष  बहादुरभाई,फरकुंद अली,रणजित देशमुख,सुभाष देशमुख अजिज कुरेशी,बद्दरभाई,खोसे पाटिल,नितीन हत्तिअंबरे,आलीमभाई,देवकर,खुदुसभाई,मुळे मामा अदी सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या