💥संविधान दिनानिमित्त काजळांबा येथील विद्यार्थ्यांचे उद्देशिकेचे लेखन..!


💥72 उद्देश पत्रिका लिहून घडीपत्रिका शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणार💥


✍️फुलचंद भगत

वाशिम :-येथून जवळच असलेल्या काजळांबा गावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी काल संविधान दिनानिमित्त" माझे संविधान माझा अभिमान" या  उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे  72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 72 विद्यार्थ्यांनी लेखन करून त्याची घडी पत्रिका शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे सांगितले.


सकाळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन वेगवेगळे घोषवाक्य असलेली फलक घेऊन संपूर्ण गावातून संविधान ग्रंथाचे प्रभात फेरी काढून जनजागृती केली.त्यानंतर शाळेमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संविधान निर्माते भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उद्धवराव,कष्टे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पदवीधर शिक्षक मधुकर महाले , विज्ञान शिक्षक विनोद राजगुरू ,ज्येष्ठ शिक्षक मदन ईंगळे, हरीश गांधी, सहाय्यक शिक्षक राजू इंगोले, सुरेश महाले, गजानन महाले, अंगणवाडी सेविका सुशीला उगले ,मंगलाताई बांडे मदतनीस रामकोर बाई उगले, संगीता  ढोके यांची उपस्थिती होती.यावेळी शाळेच्या विद्यार्थी जयश्री उगले, कृष्णाली सोनटक्के, वेदांत सोनटक्के ,राणी उगले, लक्ष्मी उगले ,दीपाली सोनटक्के ,मयुरी उगले, वेदिका मनवर, संचिता कांबळे ,सोनेरी इंगोले, सृष्टी उगले ,भक्ति वानखेडे,तुषार सोनटक्के, सानिका ठाकरे या विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांचे संविधान विषयक कार्य तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कारकीर्दीविषयी समायोजित भाषणे केली तसेच काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव म्हणून गीते सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक विनोद राजगुरू यांनी केले तसेच पदवीधर शिक्षक मधुकर महाले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक कष्टे यांनी विद्यार्थ्यांना दररोज दोन-दोन तास वाचनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन शिक्षक मदन इंगळे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या