💥भारतीय संविधानामुळेच स्त्रीयाना पुरुषांच्या बरोबरीने हक्क प्राप्त झाले - प्रकाश कांबळे जेष्ठ रिपाई नेते


💥प्रकाश कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या 72 व्या संविधान दिनी आपले विचार व्यक्त केले💥

भारतीय सविधानामुळेच भारतातील स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण,समाजकारण,राजकारण,उद्योग,नोकरी आणि सर्व क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त झाल्याचे विचार आंबेडकरवादी विचारवंत रिपाइंचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या 72 व्या संविधान दिनी व्यक्त केले.


पूर्णा शहरात 72 रा वा  "संविधान दिन" आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आंबेडकरवादी पक्ष संघटना आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी सकाळीच डॉ आंबेडकर चौकात एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी पूज्य भदंत पंय्यावंश यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी पूर्णा न प चे गटनेते उत्तम खंदारे,नगरसेवक अनिल खर्गखराटे,ऍड.धम्मा जोंधळे, ऍड हर्षवर्धन गायकवाड,विरेश कजबे,बोधाचार्य त्र्यंबक कांबळे,कामगार नेते अशोक व्ही कांबळे, आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांतजी हिवाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून उपस्थितांना प्रास्ताविकेची शपथ दिली,या प्रसंगी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून आपल्या पालकांचे व आपल्या शहराचे नावं उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

         या प्रसंगी कांबळे पुढे म्हणाले,भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ असून या ग्रंथाने तमाम भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाने वागण्याचे सूत्र आणि हक्क मिळवून दिले, परंतु 72 वर्षानंतही देशात संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था देशात निर्माण होऊ शकली नाही,देश लोकशाहीत भांडवलशाही च्या वाटचालीने नांदत आहे,हा लोकशालीला सर्वात मोठा धोका असून भारतीयांनी तो वेळीच ओळखून संविधानाचे संरक्षण केले पाहिजे.ते पुढे म्हणाले,' संविधान आमचा प्राण आहे,तोच आमचा श्वास आहे,म्हणून आपल्या शरीरात श्वास असे पर्यंत आपण संविधानाला जपले पाहिजे.आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया मुक्तपणे सर्वत्र वावरत असतील आणि आपली प्रगती करीत असतील तर ह्याच्या पाठीशी संविधानाचे बळ आहे,असेही प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विजय सातोरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात संविधान प्रबोधन गीत गायले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित यांनी केले तर पूज्य भदंत पंय्यावंश यांनी उपस्थितांना मंगल कामना देऊन संविधानपर मार्गदर्शन केले.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गायकवाड,अशोक धबाले,अय्युब कुरेशी,प्रवीण कणकुटे, मोहन लोखंडे,अतुल गवळी,साहेबराव सोनवणे,श्यामराव जोगदंड,बाबाराव वाघमारे,विजय जोंधळे,सुनील खाडे, शिवा हातागळे,शशिकांत जगताप,विजय बगाटे,शाहीर गौतम कांबळे, आदि मान्यवरासह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या