💥नाही दिवा नाही पणती..काळोख आमचा सोबती...!


💥स्वातंत्र्य सैनिकांनी मानव धर्माला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्वस्व पणाला लावले💥

 हैदराबाद मुक्तिसंग्राम व मराठवाडा मुक्ती संग्रामातील महान स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी आपल्या आयुष्याची कुटुंबाची होळी केली...तेव्हा कुठे आमच्या आयुष्यामध्ये आज भविष्यातील व प्राप्त परिस्थितीत दिवाळी आली....केवळ शासकीय स्मारके उभा राहून आपला आभार व्यक्त करणे शक्य नाही...हैदराबाद मुक्तिसंग्राम अंतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्राम सर्वधर्मीय स्वातंत्र्य सैनिकांनी मानव धर्माला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्वस्व पणाला लावले.

 आपण आपापले  पारंपारिक धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतो..आपल्या या आनंदाचे स्वातंत्र्याचे जनक आपले स्वातंत्र्यसैनिक आहेत हे आपण विसरतो...17 सप्टेंबर 1948 हा आपला स्वातंत्र्य दिन परभणीचे थोर स्वातंत्र्यसैनिक आदरणीय आर डी अण्णा देशमुख साहेब यांनी आदरणीय न्यायालयात खेटे घालून मान्यताप्राप्त करून घेतले तेव्हा कुठेही नव्या पिढीला 17 सप्टेंबर 1948 आमच्या स्वातंत्र्य दिन आहे हे कळाले.सर्वधर्मीय हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण मानवीय स्वातंत्र्यासाठी व वाळून  टाकले हौतात्म्य पत्करले.

मित्रांनो आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या  स्मरणार्थ त्यांच्या धन्यवाद तसेच ऋण व्यक्त करण्यासाठी हैदराबाद तेलंगणा मराठवाडा व कर्नाटकातील बिदर रायचूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका या ठिकाणच्या सर्व स्वातंत्र्यसंग्रामातील  पवित्र हुतात्मा स्मारकावर रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता किमान पाच दिवे लावून किमान पाच फूल वाहून पाच मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली  अर्पित करूया त्यांचे ऋण व्यक्त करूया... आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद देणाऱ्या स्वातंत्र्य जनकाला सर्वधर्मीय सर्व पक्षीय सर्वसमावेशक समाजव्यवस्थेच्या वतीने आपण सर्व हैदराबाद निजाम संस्थानातील नागरिक पाच वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावांमध्ये आपल्या हुतात्मा स्मारकाच्य साक्षीने ज्यांना जमले नाही त्यांनी गर्दी टाळून आपापल्या घरी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा संध्याकाळी एक दिवा लावावा शेकडो वर्ष गुलाम राहिलेल्या हैदराबाद संस्थानातील बहुभाषिक मराठी तेलगू कानडी  उर्दू भाषिक बांधवांना माझी नम्र विनंती आहे आपण आपला सहभाग नोंदवावा हे नम्रपणे पुन्हा एकदा आपणास विनंती करतो काहीच नाही जमले तरी आपल्या मोबाईलचा डीपी वरती एक दिवस सात  तारखेला  प्रकाश देणारा दिवा प्रतीकात्मक स्वरूपात ठेवावा...

 हैदराबाद व मराठवाडा कर्नाटक मुक्तिसंग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे समन्वय साधणारे आदरणीय  आरडी देशमुख साहेबांचे चिरंजीव एडवोकेट श्री  गिरीधर देशमुख साहेब यांचे याकामी विशेष मार्गदर्शन व मुख्य सहभाग असून मी पुन्हा एकदा सर्वपक्षीय सर्वधर्मीय स्वातंत्र्य सैनिकांना मानणाऱ्या नागरिकांना विनंती करतो त्यांच्या वंशजांना विनंती करतो या कामी त्यांनी त्यांचा सहभाग द्यावा धन्यवाद

हैदराबाद मराठवाडा  मुक्तिसंग्राम मध्ये हुतात्मे पत्करलेल्या व लढाई केलेल्या महान लढवय्या स्वातंत्र्यसैनिक यांना आदरांजली देण्यासाठी व जे महान स्वातंत्र्यसैनिक सुदैवाने आजही जिवंत आहेत त्यांना आपण विशेष रित्या सन्मानित करावे.

 त्यांच्यावर लेख लिहावे अशी त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या गावातील सर्व मान्यवर मित्र महोदयांना माझी नम्र विनंती.

      

 लेखक: सतीश सातोनकर परभणी  मराठवाडा महाराष्ट्र.

 जय मराठवाडा .जय मराठवाडा मुक्ती संग्राम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या