💥एसटी कर्मचाऱ्यांनो धीर धरा,सुखाचा काळ येणारच आहे - हभप. तुळशीदास महाराज देवकर


💥गंगाखेड येथे मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यां समोर कीर्तनात बोलताना हभप.तुळशीदास महाराज यांनी केलं प्रतिपादन💥

प्रतिनिधी / गंगाखेड

दुःखाच्या काळात धीर धरला तर त्यापुढे सुखाचा काळ येणारच असतो. एसटी कर्मचाऱ्यांनी सध्याच्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे असे प्रतिपादन संत देवईमाय संस्थांनचे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी गंगाखेड येथे मंगलवारी एसटी कर्मचाऱ्यां समोर कीर्तनात बोलताना केलं.


एसटी महामंडळ चे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गंगाखेड एसटी आगार समोर कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. महाराष्ट्रात 35 च्या वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना त्या  मृत कर्मचाऱ्यांच्या आत्म्याला शांती लाभावी व इतर कर्मचारी  आत्महत्येसारख्या वाईट विचारापासून दूर राहावेत यासाठी किर्तन सोहळ्याचे संयोजक, तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या संकल्पनेतून गुरूवारी कीर्तन सोहळा  पार पडला. यावेळी संत तुळशीदास महाराज देवकर बोलत होते. एसटी कर्मचारी हे जनतेच्या दृष्टीने सर्वात विश्वासू कर्मचारी असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवूनच बसमध्ये बसताना प्रवासी निवांत आणि सुखी प्रवास करू शकतो. टपाल पाठवताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडे  टपाल दिल्यानंतर आपण निवांत होतो. हे या कर्मचाऱ्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे .वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवून आणणारे कर्मचारी आज संकटात असताना आम्ही वारकर्‍यांनी या कर्मचाऱ्यांना साथ देणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितले. यावेळी कीर्तनकार तुळशीदास महाराज यांचा सत्कार  संत मोतीराम महाराज  गोशाळेचे संचालक तथा किर्तन सोहळ्याचे संयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी सरपंच नारायणराव धनवटे, सोपानराव टोले, जयदेव मिसे, जयवंत कुंडगिर, मुंजाभाऊ लांडे, राम भोळे, रामेश्वर बचाटे ,कारभारी नीरस, गणेश  टाक , विजयआप्पा खाकरे ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे , प्रताप कुळकर्णी आदींचा  महाराजांनी विशेष सत्कार केला. निखिल आया , बंडूसेठ कात्रे यांनी किर्तन स्थळी फराळाची व्यवस्था केली होती. ह-भ-प बर्वे महाराज, गोविंद मुंडे, ह भ प प्रभाकर महाराज बचाटे, नंदकुमार सिसोदिया ,किशन भंडारे ,गजानन पारवे आदीसह यावेळी एस टी महामंडळाचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी कार्यक्रम स्थळ येऊन पाहणी केली.

सदाभाऊ खोत यांचे कडून आंदोलनकर्त्यांचे कौतुक ;-

मागील दहा दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनात लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत सहभागी सहभागी आहेत. गंगाखेड येथे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल संयोजक व एसटी कर्मचाऱ्यांचे सदाभाऊ खोत यांनी स्वतः फोन करून अभिनंदन केले व आपला पाठिंबा व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांचा किर्तन सुरू असतानाच संयोजक सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांच्या नंबर वर कॉल आला.   फोन वरील संभाषण लाऊडस्पीकर द्वारे उपस्थित आंदोलकांनी ऐकले. एसटी कर्मचाऱ्यांनो घाबरू नका .आम्ही आपल्या सोबत आहोत. निलंबनाच्या नोटीसा कितीही निघतील. सरकारचे श्राद्ध घालूनच ही लढाई थांबेल असा विश्वास सदाभाऊंनी मोबाईलवर बोलताना व्यक्त केला.सदाभाऊ खोत यांच्या मोबाईल वरील भाषणांना उपस्थित आंदोलनकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. एस टी कर्मचारी यांनी आत्महत्या न करता आपल्या मागण्या लावून धाराव्ये , आत्महत्या हा पर्याय नाही ,हे सर्व संप कर्मचारी यांनी समजून घेतले पाहिजे ,
    परमेश्वर आपणास जीवन एकदाच देतो , हेही आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे, आपण गेल्यावर आपल्या कुटूंबावर किती मोठे संकट येते याचाही विचार आपण करायाला पाहिजे
    शिवाजीराव शिरसे

    उत्तर द्याहटवा