💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न....!


💥बाल गृहातील अनाथ मुलांसाठी फटाके व अभ्यंग स्नानचे साहित्य त्यात सुगंधित उटणे,साबण तेल या वस्तू देण्यात आल्या💥 

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सामजिक जबाबदारी म्हणून परभणी शहरातील जुना पेडगाव रोड व वसमत रोड वरील  बाल गृहातील अनाथ मुलांसाठी फटाके व अभ्यंग स्नानचे साहित्य त्यात सुगंधित उटणे, साबण तेल या वस्तू देण्यात आल्या व या मुलांची दिवाळी आनंदित करण्याचा एक छोटा प्रयत्न करण्यात आला तसेच ही मुलं अनाथ नसून ती प्रहार जनशक्ती पक्षाच्या परिवारातील घटक आहेत असा संदेश या वेळी देण्यात आला.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मीडिया प्रभारी नकुल होगे, अरुण कांबळे, इरफान बेग इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या