💥तरुणांचे मानसशास्त्र लक्षात घेणे आवश्यक : मा.श्री इन्द्रजीत देशमुख


💥स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृतिसमारोह प्रसंगी देशमुख हे बोलत होते💥  

परळी (वार्ताहर)- वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृतिसमारोहाचे उद्घाटन डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . डॉ . प्रमोदजी येवले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभ संपन्न झाले . या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख  संस्थेचे सचिव मा . रवींद्रजी देशमुख आणि कोषाध्यक्ष प्रा . प्रसादजी देशमुख यांची विशेष उपस्थिती होती दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले . यात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडला महाविद्यालयाने विविध क्षेत्रामध्ये घेतलेल्या उत्तुंग  भरारीचा धावता आलेखच त्यांनी श्रोत्यांसमोर विशद केला.

          या प्रस्ताविकानंतर महाविद्यालयातील श्री नागभूषण फुलारी यांनी महाविद्यालयास समर्पित केलेल्या स्वर्गीय शामरावजी देशमुख यांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले . त्यानंतर स्व . शामरावजी देशमुख यांच्या कार्याचा , दातृत्वाचा आणि एकूणच त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे स्वरचित कृतज्ञतागीत प्रा . डॉ . श्याम नेरकर यांनी प्रस्तुत केले समाजामध्ये संवेदना बोथट होत चालली असल्याची खंत मा . कुलगुरू  डॉ . प्रमोदजी येवले यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली . यासाठी समाजामध्ये सामाजिक बांधिलकी टिकून राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे . असेही प्रतिपादन त्यांनी केले .

      स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृतिसमारोहा निमित्ताने महाविद्यालयामध्ये  शालेय , कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते . त्याला परळी परिसरातून उत्तम असा प्रतिसाद लाभला . त्यात प्रथम -द्वितीय - तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा माननीय कुलगुरूंच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला . निबंध व रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व अनुक्रमे रुपये 1000 रुपये 700 आणि रुपये 5OO असे प्रोत्साहन बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .निबंध स्पर्धामध्ये शालेय गटामधून कु . पायल बालू पवार अभिनव विद्यालय परळी . द्वितीय पारितोषिक कु . शिवकन्या ब्रह्मदेव घुगे न्यू हायस्कूल परळी . तृतीय पारितोषिक कु . गौरी अभिनव जोगदंड अभिनव विद्यालय परळी . व उत्तेजनार्थ पारितोषिक कु . अनन्या संदीप काळे विद्यावर्धिनी विद्यालय परळी .यांना प्राप्त झाले तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून प्रथम पारितोषिक कु . तेजस्विनी मुंडे महिला महाविद्यालय परळी .द्वितीय पारितोषिक कु .पल्लवी ज्ञानोबा दहिफळे न्यू हायस्कूल तर तृतीय पारितोषिक कु .कदरकर माधवी संतोष महिला महाविद्यालय परळी . हिला मिळाले असून उत्तेजनार्थ पारितोषिक कु .प्रतिक्षा बालाजी गुट्टे वैद्यनाथ महाविद्यालय परळी . हिने प्राप्त केले . वरिष्ठ महाविद्यालयीन गटामधून प्रथम पारितोषिक कु- अंजली सुनील वाघमारे वैद्यनाथ महाविद्यालय परळी .द्वितीय पारितोषिक कु .मयुरी जगतकर महिला महाविद्यालय परळी , तृतीय पारितोषिक कु_ पूनम रामकिशन मुंडे वैद्यनाथ महाविद्यालय परळी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक कु_ सय्यदा सुजान मकसूद हिला प्राप्त झाले .

      तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये गटातून कुमारी शिवकन्या ब्रह्मदेव घुगे न्यू हायस्कूल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर अनुष्का अनिरुद्ध देवकते भेल सेकंडरी स्कूल द्वितीय क्रमांक . ऐश्वर्या सतीश वानरे न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक आणि चैत्राली संजय कळसकर अभिनय विद्यालय हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले . तसेच महाविद्यालयीन गटामधून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची संध्या व्यंकट कळसाईल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर याच महाविद्यालयाची कु .प्राची राजनाथ राजमाने हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला . ज्योती गंगाधर क्षीरसागर नवगण महाविद्यालय हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला तर वैद्यनाथ महाविद्यालयाची कुमारी अश्विनी लक्ष्मण गुट्टे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले . या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .

               कुलगुरूंच्या उद्घाटनपर भाषणानंतर या समारोहात 'आजची तरुणाई व सामाजिक बांधिलकी' या विषयावर महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते मा. इंद्रजीतजी देशमुख यांचे परळीकरांच्या  मनाला भुरळ पाडणारे  व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात त्यांनी मानवी जीवनावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की , शिक्षणाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील असे सर्वकाही दिले मात्र शिक्षण हे माणूस देऊ शकले नाही.आजच्या पिढीला आवश्यक विचारांची पेरणी होणे अपेक्षित आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले की, ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्या अनुरूप त्याचा “स्व” शोधला गेला पाहिजे.माणसाची मूळ मानसिकता अतिशय महत्त्वाची असते. बालपणातच योग्य दिशा मिळाली तर तरुण वयात व्यक्ती भरकटत नाही.इत्यादी अनेक जीवनाशी निगडित महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला. त्यांच्या वक्तव्यांत संत वचनांची उपस्थिती लक्षणीय होती .

             यानंतर अध्यक्षीय समारोपात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व .शामरावजी देशमुख यांच्या स्मृती जगविण्यात आल्या. अध्यक्षांच्या वतीने संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्रा.प्रसादजी देशमुख यांनी स्व. शामरावजी देशमुख यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी या महाविद्यालयाची उभारणी केली असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर त्यांचा दातृत्वाचा आढावा घेताना त्यांनी दान म्हणून दिलेल्या दहा एकर जमिनीचा उल्लेखही केला.या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते . महिलांचीही लक्षणीय संख्या या कार्यक्रमाला लाभली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रा .डॉ . यल्लावाड  व प्रा .डॉ . जगतकर यांनी केले तर आभार प्रा .डॉ . जगतकर यांनी मानले ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या