💥त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त चिखली बंदला उत्स्‍फुर्त प्रतिसाद....!


💥घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम धर्मगुरूंच्या वतीने तहसिलदार अजितकुमार येळे यांना देण्यात आले निवेदन💥

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली प्रति.: जातीय विद्वेश पसरविणाऱ्या संघटनांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात चलती सुरु असुन याचे पडसाद त्रिपुराच्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. सुमारे 23 मुस्लीम प्रार्थनास्थळे (मस्जीद) पाडली गेली असुन कित्येक मुस्लीम समाज बांधवांचे निघृन हत्या करण्यात आली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासह भारताच्या काही अपवाद वगळता सर्वच प्रसारमाध्यमांनी चुप्पी धारण केली आहे. मुस्लीम समाजातील विविध प्रश्‍नांबाबत सजग भुमिका घेणाऱ्या रज़ा ॲकेडमी ने या विषयी ठोस भुमिका घेत दिनां 12 नोव्हेबर 2021 रोजी भारत बंद चे आयोजन केले या आवाहनास प्रतिसाद देत चिखली शहरातही बंद चे आयोजन करुन या आयोजनास उत्स्फुर्त सहभाग देत बंद पाळण्यात आला. 


या बंदच्या अनुषंगाने विद्मान तालुका दंडाधिकारी अजितकुमार येळे यांना चिखली शहरातील मुस्लीम धर्मगुरु यांच्या वतिने निषेधाचे निवेदन देण्यात आले या वेळी आलीम ताजोद्दीन साहाब, मुदब्बीर आलीम साहब, हाफिज़ मखदुम साहब, हाफिज़ यासीन साहाब यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवेदनात नमुद केल्या प्रमाणे त्रिपुरामध्ये झालेला हिंसाचार हा पुर्वनियोजीत होता ज्यामध्ये मुस्लीम समाजातील बहुसंख्य समाजबांधवांची हत्या करुन त्यांच्या निवासस्थाने उध्वस्त करण्यात आली. त्रिपुरा मधील मस्जीदींची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात येऊन मुस्लीम धर्माचे पवित्र ग्रंथाची अवहेलना करण्यात आली. एकुणच या समाज विघातक कृती निषेधार्त असुन यात सहभागी असलेल्या संबंधीतांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करुन कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच अशा प्रकारचा हिंसाचार पुन्हा घडणार नाही याची शास्वती मिळावी या आशयाचे निवेदन मा. महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना चिखली तहसिलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या 7 वर्षांच्या कार्यकाळात जनतेच्या विकासाच्या प्रश्‍नांएवजी पक्ष चालविणाऱ्या विविध संघटना संस्थांना बळकटीकरण करण्याचे काम करण्यात येत आहे. सामाजीक दृष्ट्या अल्पसंख्यांक असणाऱ्या समुदायाला वेठीस धरत समुदायाचे विविध दृष्ट्या दमन करण्यात येत आहे. अच्छेदिन चे स्वप्न दाखवत जनतेची दिशाभुल करुन सत्तेत आलेल्या पक्षाने विध्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवुन अराजकता माजवली आहे याच्या निषेधार्त आज च्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दिनांक 11 नोव्हेंबर 2021 च्या रज़ा ॲकेडमी पुरस्कृत बंदला चिखली शहरातील किराणा व्यापारी संघ्टना, व्यापारी संघटना, अडते व्यापारी संघटना, भाजीपाला अडते संघटना, ङिपी.रोड व्यापारी संघटना, मोबाईल गॅलरी संघ्टना, मटन मार्केट संघटना, बुट चप्पल व्यापारी संघटना, फ्रुट मार्कट व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना तसेच शहरातील इतर व्यापारी वर्ग यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन बंदला 100% सहभाग दिला. या बंदमध्ये अ.रफिक सेठ, आसीफ भाई, सलीम मेमन, शेख करामत, शेख अनिस, डॉ.इसरार, हाजी अ.रऊफ, शहेज़ाद अली खान, मोबीन मियाँ. इमरान शेख, खलील बांबान, अमिन खान,अतहर काज़ि, अकील खान, ज़ाकीर खान, मुनव्वर साहेब, उबेद अली खान, शेख कादर, परवेज़ जमादार, अनवर कुरेशी, अंसार कुरेशी, मोहसीन हाजी, पत्रकार युसुफ शेख, इफ्तेखार खान, रमिज़ राजा, आशीक जमादार, इमरान शेख, तंज़िम हुसेन, रज़ा ॲकेडमीचे इमरान खान, शेख तालीब, शेख हुसेन, शेख शोएब, मो.ज़फर, मो.तारीक, शेख ज़कीर, मो.मुजाहीद , 

इत्यादी मुस्लीम समाजातील समाजसेवक राजकारणी विविध संस्थांचे पदाधिकारी व बहुसंख्य चिखलीकर नागरीकांनी बंद च्या अयोजनात आपला सहभाग नोंदविला...

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या