💥पुर्णेत आयोजित एक दिवसीय मोटिवेशन फुटबॉल चषकचे विजेता ठरली आर.आर.सी.फुटबॉल टिम...!


💥मोटिवेशन फुटबॉल चषक सामण्यात 8 शहरांनी आपला सहभाग नोंदविला होता💥

पूर्णा ; खेळा करीता ओळखल्या जाणार्‍या पूर्णा येथे आर आर सी मैदानावर एक दिवसीय मोटिवेशन फुटबॉल या खेळाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 8 शहरांनी आपला सहभाग नोंदविला होता त्यात नांदेड, वसमत,परभणी, जालना व पूर्णा. या संघांनी सहभाग घेतला होता. यात आर.आर.सी.पूर्णा व आर. आर.सी.जालना या दोन संघात अंतिम सामना खेळण्यात आला  व तो सामना .आर.सी. पूर्णा ने जिंकून आपल्या नावे केला. 

कित्येक वर्षा नंतर पूर्णा च्या या पाशवर भूमि वर हे सामने पाहावयास भेटले. काही माझी खेळाडूनी सांगितल्या प्रमाणे फुटबॉल चषक 56 वर्षा नंतर पूर्णा ने जिंकला आहे. आर.आर.सी फुटबॉल चे प्रशिक्षक सूरज शिंदे यांनी पूर्णा या शहरा मध्ये फुटबॉल जिवंत ठेवला असून त्याला येक चांगली दिशा सुधा देत आहेत. या एक दिवसीय मोटिवेशन फुटबाल चषक यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी उत्तम कांबळे,नारायण कदम,रमेश उमरे, मुकुंद भोळे,सुनील जाधव, यशवंत वाघमारे,राजेश्वर येसूलकर,ताज मामा, रवी वाघमारे,मिलिंद कांबळे,साहेबराव  सोनावणे,प्रकाश तिवारी, बरकुंटे,सलीम सर, शुभू खर्गखराटे, आसिफ भाई,कांचन ठाकुर व  लहान मोठ्या खेळाडूंनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या