💥मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उद्‌घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार...!


💥देश व राज्यभरातील सुमारे दोन हजाराहून अधिक पत्रकार बांधव या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार💥

 ✍️ मोहन चौकेकर

बारामती - मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाला माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे  अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असून मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या ठिकाणी 18 व 19 डिसेंबर  रोजी  पार पडणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून देश व राज्यभरातील सुमारे दोन हजाराहून अधिक पत्रकार बांधव या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज बारामती येथील गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांशी शरद पवारांनी अधिवेशनाबाबत सविस्तर चर्चा केली. अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत अनुकूलता दर्शवली.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, बारामती तालुका मराठी  पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व यजमान हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर उपस्थित होते...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या