💥परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ; जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी....!


💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ; पक्ष श्रेष्ठीवरील नाराजी कारणीभूत💥

परभणी (दि.२३ नोव्हेंबर) :- परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आ.दुर्रानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तय्यारीत असल्याचे राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे.

आ.बाबाजानी दुर्रानी गेल्या काही महिन्यांपासून या जिल्ह्यातील पक्षांतर्गत घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीने घेतलेल्या काही निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात असून या संदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना त्यांनी त्यास दूजोरा दिला.लवकरच आपण माध्यमांशी बोलू असे ते म्हणाले.

आमदार दुराणी हे श्रेष्ठीवर कमालीचे नाराज होते.या अस्वस्थेपोटी आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते आपली नाराजी व्यक्त करतील अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती.कारण अलीकडे ते पक्षीय वर्तुळातून थोडी बाजूला सरकले होते.अलिप्त होते.

गेल्या काही महिन्यांपासून या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या प्रमाणावर रूसवे-फुगवे सूरू होते.विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी  घेतलेल्या भूमिका,माजी आमदार विजय भांबळे यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत राजकारणातील खेळ्या व पक्षश्रेष्ठीचे त्या गोष्टींना समर्थन तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनाही अलीकडील श्रेष्ठीचे समर्थन, यांच्याबरोबर अलीकडच्या काळातील दुराणींचा संघर्ष, सोनपेठ येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा परस्परच पक्ष प्रवेश सोहळा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्ष पदावर श्रेष्ठीद्वारे दुराणी समर्थकांना हटवून माजी महापौर प्रताप देशमुख यांची निवड वगैरे साऱ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आ. दुर्रानी कमालीचे अस्वस्थ होते. नाराज होऊन बसले होते.परंतू श्रेष्ठीद्वारे या नाराजीची दखल घेतल्या गेली नाही.त्यामूळेच दुराणी यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले असे चित्र आहे. 

दरम्यान दुरानी यांनी पुढील भूमिकेबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता केली नाही,मात्र ते आपल्या राजीनाम्याच्या भूमिकेवर निर्णयावर ठाम आहेत,लवकर ते राष्ट्रवादीस सोड चिठ्ठी देऊन पुढील भूमिका घेतील असा अंदाज दुराणी यांच्या समर्थकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या