💥वाशिम जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन शांतता ठेवावी - पोलिस अधिक्षक बच्चन सिंंग


💥जिल्हा पोलिस दलाचे जिल्हावाशीयांना जाहीर आवाहन💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-अलीकडील त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ ठीक ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटना अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात शांतता कायम ठेवणे करिता जातीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस स्टेशन चे अधिकारी आणि बीट मार्शल हे सतत आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क पेट्रोलिंग करीत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत मनुष्यबळ लाठी हेल्मेट ढाल सह पो. स्टे. ला  राखीव ठेवण्यात आले आहे.जातीय दृष्ट्या संवेदनशील परिसरात रुट मार्च घेण्यात येत आहेत. 

शांतता समिती व समाज प्रतिनिधी लोकांच्या च्या सभा आयोजित करून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर सेल हे सतत सोशल माध्यमांवर लक्ष ठेवून आहे.सदर गंभीर परिस्थिती चे पोलीस विभाग बारकाईने निरीक्षण करीत आहेत. सध्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात कोठेही कायदा आणि सुव्यस्थेची किंवा हिंसाचाराची  परिस्थिती नाही परंतु जर कोठेही हिंसाचाराची घटना घडत असल्यास त्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असे वाशिमचे पोलिस अधिक्षक यांनी सांगीतले.तसेच वाशिम पोलिस दलाचे वतीने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन वाशिमचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चन सिंग , IPS यांनी केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या