💥एसटी कर्मचारी आंदोलनातील बांधवांना वर्ल्ड मराठा ऑर्गनाइजेशन कडून नास्ता-पाणी मदतकार्य...!


💥एसटी पुरुष कर्मचारी, महिला कर्मचारी त्यांच्या मुलाबाळांना घेऊन चिखली बस स्थानकामध्ये आंदोलनाला बसले आहेत💥

 ✍️मोहन चौकेकर

चिखली : सध्या राज्यात एसटी कर्मचारी बांधवांना न्याय देण्यासाठी चालू असलेल्या संपात कित्येक एसटी पुरुष कर्मचारी, महिला कर्मचारी त्यांच्या मुलाबाळांना घेऊन चिखली बस स्थानकामध्ये आंदोलनाला बसले आहेत.

राज्याच्या प्रत्येक गावाला जोडणाऱ्या एसटीला, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीला साथ देण्यासाठी आपण आंदोलनाला बसलेल्या कर्मचारी बांधवांना WMO बुलढाणा परिवाराकडून  माणुसकी धर्म जपत 50 ते 70 कर्मचाऱ्यांना ,नास्ता-पाण्याची वाटप आज सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी  करण्यात आले आहे.

 बस कर्मचारी वर्ग यांनी WMO ने केलेल्या या उपक्रमाबद्दल सगळ्या WMO परिवाराचे आभार मानले तसेच या उपक्रमासाठी ज्यांनी मदत व सहकार्य केले त्यांचे सुद्धा विशेष आभार WMO टीम च्या वतीने केले या कार्यक्रमासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बुलढाणा परिवारातील श्री. निखिल अशोकराव देशमुख, पवन लाटे, निलेश तांगडे , सुदाम कव्हळे, भास्करराव तांगडे काका, पवन शिराळे सर, हर्षल लोखंडे,यश जाधव,विलास खंडारे हे उपस्थित होते...

              ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या