💥नांदेड येथील हुजूर साहीब सचखंड गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत अनुकंपा धारकांना सेवेत समाहून घ्या....!


💥 अशी मागणी हजूरी क्रांती दलाचे पदाधिकारी जसबीरसिंग बुंगाई यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे💥

नांदेड (दि.१२ नोव्हेंबर) येथील हुजूर साहीब सचखंड गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत अनुकंपा तत्वावर नौकरी मिळविण्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केलेले आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने काही प्रलंबित अर्जावर अद्यापही नोविचार करण्यात आलेले नाहीत. तेव्हा सर्व पात्र उमेदवारांना कामावर घेण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी हजूरी क्रांती दलाचे पदाधिकारी स. जसबीरसिंघ बुंगई यांनी गुरुद्वारा बोर्डाकडे एका निवेदनानुसार केली आहे. 

गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष, सचिव, सदस्यांना आणि अधीक्षक यांना उद्देशून सादर केलेल्या निवेदनात जसबीरसिंघ बुंगाई यांनी पुढे म्हंटले आहे की गुरुद्वारा बोर्डातील मृत पावलेल्या किंवा शारीरिक विकलांगते मुळे नौकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारिसांना नौकरीवर घेण्यासाठी सादर झालेले अनेक अर्ज प्रलंबित आहेत. गुरुद्वारा बोर्डाने काही कर्मचाऱ्यांना कामावर घेतले असून काहींचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, अशा सर्वांना नौकरीवर समाहून घेऊन समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या