💥राजकारणात माणुस राजा तर मग त्याचं मन सुद्धा राजासारखं असावं....!


💥भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडें यांचे प्रतिपादन💥


   राजकारणात काम करत असलेला राजकिय माणुस खऱ्या अर्थाने राजाच असतो.पण त्याचं मन राजासारखं असणं तितकंच महत्वाचं. पक्ष अनेकांचे वेगवेगळे पण विधायक कार्यात वैचारिकता विभिन्न असता कामा नये. सुडाने आणि द्वेषाने पिछाडलेला राजकारणी काही काळासाठी यश मिळवु शकतो. पण त्याच्या भुमिकेत जनकल्याण नसतं. विचाराची गुंफण दिलदार मनाचा राजा आणि त्यातुन जोपासली जाणारी नाती ही खऱ्या अर्थाने समाजात आदर्श प्रस्थापित करतात. बीड जिल्हा मागास आहे. आमची भुक कमी. पण आमच्या जिल्ह्यातुन एखादं लेकरू प्रगत जिल्ह्यात जावुन तिथे नाव कमवत असेल तर अशांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहणार या शब्दांत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडेंनी परळीचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या रेडीमिक्स सिमेंट कॉंक्रेट प्रकल्पाला शुभेच्छा देताना कौतुक केले.


    निमित्त होते पवन मुंडे यांनी पुण्यात सुरू केलेल्या रेडीमिक्स सिमेंट कॉंक्रेट प्रकल्प प्रथम वर्धापनाचे. यासाठी आ.सुनिल आण्णा शेळके, महेश लांडगे, माधुरीताई मिसाळ , dcp मंचकराव इप्पर,महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सर्वेश जावडेकर,केशव घोळवे,सदाशिव खाडे, योगिनी नागरगोजे,दत्ता खाडे,यासह अन्य मंडळी उपस्थित होती. प्रसंगी पंकजाताईनं मांडलेले विचार खऱ्या अर्थाने राजकिय क्षेत्रात आदर्श देणारे.वास्तविक पाहता दुसऱ्या पक्षाचे आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याहुन महेश आण्णा शेळकेंनी पंकजाताई माझ्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभा राहतात आणि आ.लांडगे यांनीही जाहिरपणे नात्याची कबुली दिली. त्यात बोलताना पंकजाताई म्हणाल्या की राजकारणात काम करताना मनाचा मोठेपणा, वैचारिक भुमिका महत्वाची असते. हे क्षेत्र नाती जपण्याचं आणि सद्‌गुणाचं आहे. खरंच राजकारणात काम करणारा पुढारी हा राजाच असतो. पण त्याचं मनसुद्धा राजासारखं असावं. सुडाने आणि द्वेषाने पेटलेल्या मन ज्यात समाज कल्याण कधीच नसतं. सुडाची मैत्री विनाशाकडे घेवुन जाते तर चांगली माणसं एका व्यासपीठावर येतात तिथे सुसंस्कृतपणा प्रस्थापित होतो. स्व.गोपीनाथराव मुंडे यांची शिकवण आम्हाला जातीपातीच्या पलीकडे जावुन मानव कल्याणासाठी जगा अशी आहे. तो वारसा आम्ही आदर्श डोळ्यासमोर घेवुन चालवतो. आपल्या जिल्ह्यातील एखादा तरूण प्रगत जिल्ह्यात जेव्हा व्यवसाय उभा करतो तिथे माझ्या डोळ्यासमोर मागास जिल्हा आणि आपली भुक त्यात लोक घेत असलेले कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा. बीड जिल्ह्यातला माणुस जेव्हा इतरत्र जावुन काही करू पाहतो त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहते हे सांगताना त्यांनी पवन मुंडे यांच्या कर्तृत्वाचं त्यांनी कौतुक केलं. उद्योगात प्रामाणिकपणा आणि शब्दांवर विश्र्वास या गोष्टी महत्वाच्या असतात. वर्तमान व्यवस्था कोरोना संकटाने ढासळलेली असताना अशा वेळी आत्मनिर्भर भुमिकेतुन स्वावलंबी जीवनाचा मार्ग असे तरूण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचं कौतुक नसे थोडके असं म्हणत त्यांनी आपल्या सुसंस्कृत भाषणाच्या वाणीला विराम दिला. यावेळी व्यासपीठावर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन विनोद सामंत, जर्मनी रिटर्न उद्योजक भरत गित्ते,विजयकुमार कोपले,दीपक बांगर, पुण्यातील व्यावसायिक, उद्योजकासह बालासाहेब गित्ते,रासप चे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड,भाजपा जेष्ठ नेते श्रीराम मुंडे,नीळकंठ चाटे,राष्ट्रवादी नेते माणिक फड,नरसिंग शिरसाट, दत्तात्रय गुट्टे, माधवराव दहिफळे, पुण्याचे उद्योजक अशोक मुंडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. युवा उद्योजक सम्राट गित्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा.पवन मुंडे यांच्यावर प्रेम करणारी राज्यभरातील असंख्य उद्योजक, आप्तेष्ठ,हितचिंतक व मित्र मंडळी उपस्थित होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या