अरें नैतिकतेच्या बुरख्याआड अनैतिकतेचा कर्ता तुच अन् करवीताही तुच....!


[ अविश्वासपात्र ठरत असलेल्या राजकीय क्षेत्रातील नैतिकतेचे भान हरपलेल्या तत्वभ्रष्ट राजकारण्यांवर चारओळी ]

अरें नैतिकतेच्या बुरख्याआड अनैतिकतेचा कर्ता तुच अन् करवीताही तुच स्वतःच्या स्वार्थापोटी स्वकीयांचा राजकीय मानसिक अन् आर्थिक बळी देऊन दलाल बाजार बसव्यांचा बाजार भरवीता ही तूच...!

अरें विषारी सर्परूपी शत्रूंच्या ताटात उष्ट्यावर ताव मारीत स्वकीयांच्या भरल्या ताटात माती कालवीताही तुच अन् स्वतःच्या स्वार्थापोटी सोबत्यांचा राजकीय बळी देत त्यांचा विश्वासघात करवीता ही तुच...!!

अरे सत्तेच्या मस्तीत समाजविघातक विषारी सापांचा दरबार भरवीता ही तुच अन् विषारी सापांना प्रेमाने दुधाचे घोट भरवीता ही तुच अन् शेवटी याच विषारी सापांच्या फुस्कारांना बळी पडून इतरांना आपसात लढवीता ही तुच...!

अरे सत्ता अन् पदांच्या मस्तीत गुन्हेगार अन् विषारी सापांच्या जमातींना पोसवीता ही तुच अन् स्वकीयांच्या बोकांडीवर समाज विघातक दृष्ट शैतानांना बसवीता ही तुच..अन् कुत्र्या परी धरल तर चावतो अन् सोडल तर पळतोय असा दुहेरी कारभार चालवीता ही तुच...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या