💥भिख में पदमश्री मिल सकता है आजादी तो खून देकर ही मिलती है - सरदार रणजीसिंह रंधावा


💥सिख धर्मियांच्या विरोधात अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अपशब्द वापरणाऱ्या देशद्रोही कंगना रणावतवर कारवाई करा💥

 मुंबई/उल्हासनगर (दि.२५ नोव्हेंबर) - उल्हासनगर राष्ट्रवादी कांग्रेस सिख सेलच्या वतीने आज सिख धर्मियांच्या विरोधात अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विषारी शब्दांचा वापर करणाऱ्या देशद्रोही फिल्म ॲक्टर कंगना रणावत विरोधात तिव्र संताप व्यक्त करीत तिचा निषेध करण्यात आला यावेळी कंगनावर कायदेशीर कारवाई मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिख सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरदार जरनैलसिंघ गाड़ीवाले उल्हासनगर शहरचे नवनिर्वाचित  जिल्हाअध्यक्षा श्रीमती पंचम ओमी कालानी यांचे आदेशाने व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री नरेश श्रीराम गायकवाड व सिख समाजाचे युवा नेतृत्व सरदार चन्नीसिंघ जी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सिख सेलचे कार्याध्यक्ष सरदार रंणजीत सिंघ रंधावाजी व श्री.मुकेश गुप्ता यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या  कंगना राणावत विरोधात संविधानिक प्रक्रिया पुर्ण करीत गुन्हा दाखल केला यावेळी कंगना विरोधात बोलतांना सरदार रणजीतसिंघ रंधावा म्हणाले की भिख में पदमश्री मिल सकता है आजादी तो खून देकर ही मिलती है...१५ अॉगस्ट १९४७ ला मिळालेल स्वातंत्र्य भिख मध्ये मिळाल होत खर स्वातंत्र्य तर सन २०१४ रोजी मिळाल असे वक्तव्य करणाऱ्या कंगना रणावतने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारी स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे असून कंगनाने सिख धर्मियांच्या विरोधात सुध्दा अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विषारी वक्तव्य करीत शहिद शुरवीर सिख योध्द्यांचा अपमान केल्याने तिच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या