💥लखीमपूर खिरी येथील शहिद शेतकऱ्याची कलश यात्रे पूर्णेत स्वागत करून अभिवादन करण्यात आले....!


💥यावेळी डॉ.आंबेडकर चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले💥


पूर्णा - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेत शहिद झालेल्या शेतकऱ्याची कलश यात्रा आज सोमवार दि.०८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं.०५-०० वाजता स्वागत करून अभिवादन करण्यात आले प्रारंभी महात्मा बसवेश्वर, शिवाजी महाराज व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्या नंतर डॉ.आंबेडकर चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी कॉ जितेंद्र चोपडे कॉ.उद्धव पौळ माजी नगराध्यक्ष दिलीप हनुमंते माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब ' नगरसेवक उत्तम खंदारे दादाराव पंडित ' महेबूब कुरेशी . रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी सुनिल गायकवाड वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष श्याम सुंदर काळे माजी नगरसेवक जलील कुरेशी आदि उपस्थित होते यावेळी शहिद शेतकऱ्यांच्या अस्थिकलशाना उपस्थितांच्या हस्ते पुष्प सर्मपण करून अभिवादन करण्यात आले या नंतर प्रात निधिक स्वरूपात महेबूब कुरेशी दिलीप हनुमते दादाराव पंडित कॉ उद्धव पौळ यांनी श्रद्धांजली अर्पण आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नसीर शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.वाय एफ वाय युवा संघटनेच्या पदाधिकारी अमन जोंधळे त्या च सहकारी यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या