💥सरपंचांनी लोकसहभागातून गावाचा शाश्वत विकास साधावा...!


💥मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांचे प्रतिपादन💥

फुलचंद भगत

वाशिम:-सरपंचांनी लोकसहभागातून गावाचा शाश्वत विकास साधावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत यशदा पुणे कडून आयोजित नवनियुक्त सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी त्यांनी सरपंचांशी संवाद साधला. 


यावेळी यशदा, पुणे चे अधिकारी डॉ रामप्रसाद पोले, विस्तार अधिकारी विजय खिल्लारे यांची उपस्थिती होते. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि वीज ह्या लोकांच्या मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रित करुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून कार्य करण्याचे आवाहन निकम यांनी उपस्थित सरपंचांना केले. नवीन निवडून आलेले सरपंच यांनी गावाचा अभ्यास करून विकासाचे प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते पुढे म्हणाले. यशदाचे अधिकारी डॉ रामप्रसाद पोले यांनी प्रशिक्षण कार्यक्रमातील विवीध विषयाच्या मार्गदर्शनाचा उपयोग  पंचायत प्रशासन व गाव विकासासाठी करण्याचे आवाहन केले. शिक्षण, आरोग्य व उपजीविका या क्षेत्रात कार्य करून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी गाव स्तरापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी यशदाचे प्रशिक्षण सत्र समन्वयक देवीदास ढगे, सत्र सहाय्यक रविन्द्र इंगोले, मार्गदर्शक विजय खिल्लारे, परमेश्वर अंभोरे, वैशाली मिसाळ, विशाल सदार, विलास भालेराव, पंकज चव्हाण यांची उपस्थित होती. विदाता फाऊंडेशन प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक 22 नोव्हेंबर  रोजी सुरु झालेल्या या 4 दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप 25 तारखेला होणार असल्याची माहिती प्रशिक्षण सत्र समन्वयक देविदास ढगे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या