💥नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून उषाताई लक्ष्मण मगरे यांना पी.एच.डी.प्रदान......!


💥डॉ बाबासाहेब आंबेडकरचे धर्मविषयक विचार : एक ऐतिहासिक अभ्यास' या विषयात त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले💥

पूर्णा ; येथील डॉ. आंबेडकर नगर मधील रहिवासी दिवंगत ग्राम विस्तार अधिकारी यांची कन्या उषाताई लक्ष्मण मगरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दिनांक २८-१०-२०२१ या दिवशी पीएच. डी. प्रदान केली. यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील उप-प्राचार्य, सुप्रसिद्ध विचारवंत व इतिहास तज्ज्ञ प्रो. डॉ. उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 'डॉ बाबासाहेब आंबेडकरचे धर्मविषयक विचार : एक ऐतिहासिक अभ्यास' या विषयात त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे.

अतिशय महत्त्वपूर्ण व धम्माच्या अभ्यासकांसाठी त्यांचा हा शोध प्रबंध उपयुक्त असणार आहे. त्यांनी हा शोध प्रबंध यशवंत महाविद्यालय, नांदेड या संशोधन केंद्रातून प्राचार्य जी. एन. शिंदे यांच्या सहकार्यातून पूर्ण केला आहे. संशोधनाच्या कामी त्यांना मोलाचे मार्गदर्शन भदंत उपगुप्त महाथेरो, डॉ. पंचशील ऐकंबेकर, डॉ. शेखर घुंगरवार, डॉ. आदिनाथ इंगोले, इंजि. भीमराव हाटकर, डॉ. सुभाष रगडे, विश्वनाथ शेगावकर, डॉ. ढाले, प्रा. अशोक कांबळे, श्रीकांत हिवाळे, गौतम वाघमारे, ऐडके, गंगाराम भालेराव त्यांच्या मातोश्री शांताबाई लक्ष्मण मगरे, त्यांचे बंधू सुनील, अनिल, सुबोध, नसीर, साहेब, विलास, मेहुने किशोर विठ्ठल एंगडे, संजय पोचाजी उबारे यांनी केले. 

त्यांच्या या नेत्रदिपक यशाबद्दल जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, नामदेव मगरे, माजी उपनगराध्यक्ष न. प. गट नेते उत्तम भय्या खंदारे, पत्रकार विजय बगाटे, नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, दादाराव पंडित, ॲडव्होकेट धम्मदीप जोंधळे, प्राचार्य डॉ. केशव जोंधळे, कामगार नेते अशोक कांबळे, विजय जोंधळे, दिलीप गायकवाड, पी. जी. रणवीर, पाईकराव आदींनी अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या