💥कल्याणराव फपाळांच्या निष्ठावान सेवेचा योगेश्वरी परिवारा कडून सन्मान....!


💥योगेश्वरी शुगर्सचे कार्यकारी संचालक ॲड.रोहित आर.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-आजकाल अनेकजन स्वत:च्या मतलबा साठी पुढेपुढे करतांना दिसून येतो. काम कमी आणि अधिक पैसा मिळवण्या साठीच जो तो प्रयत्नशिल असतानांची अनेक उदाहरणे दिसतात. मात्र आपल्याला दिलेले,मिळाले काम हेच कर्तव्य समजून त्या साठी प्रामाणिक पणे जिवओतून काम करणारी मंडळी सुद्धा आहेत. अशा मानसांच्या कारकिर्दिचा गौरव होणे हिच त्याच्या साठी जिवणातली सर्वात मोठी कमाई असते. गेली ४१ वर्ष प्रामाणिक पणे दोन साखर कारखाण्यात शेतकी विभागात प्रामाणिक पणे कर्तुत्व बजावणा-या निष्ठावान असलेल्या कल्याणराव फपाळ यांचा योगेश्वरी परिवाराच्या वतीने सत्कार करत कारकिर्दिचा गौरव योगेश्वरी शुगर्स चे कार्यकारी संचालक ॲड.रोहित आर देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी बीड चे पत्रकार हरिषचंद्र सोनवने,प्रदिप बडे,तोंडे,कारखाण्याचे अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती. कल्याणराव फपाळ यांच्यातील गुण न्याहळत गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना ,देवनांद्रा. या कारखाण्याचे संस्थापक अध्यक्ष स्व स गो नखाते यांनी कल्याणराव फपाळ यांना १९८० च्या दशकात कारखाण्यात नौकरी वर घेतले. सात आठ वर्षा नंतर त्यांना शेतकी विभागात टायरगाडी प्रमुख म्हणून कारखाना साईट दिली गेली. अतिषय नियोजन बद्ध त्यांनी त्यांचे काम केले. स्व नखाते साहेबां नंतर ईतरांच्या कार्यकाळात ही त्यांची कामगिरी सराहनी राहिली आहे. १९९८ नंतर मात्र कारखाण्यात कलह वाढला आणि कारखाना बंद पडला. यात कर्मचा-यांना मोठा संघर्ष करावा लागला ऊस उत्पादक ही देशोधडीला लागले. अशा परिस्थितीत माजी केंद्रिय मंत्री स्व गोपिनाथराव मुंडे हे या भागातील परिस्थिती लक्षात घेत शेजारी धर्म पाळत मदतीला धावले वैद्यनाथ साखर कारखान्याने गोदावरी दुधना भाडे तत्वावर चालवण्यास घेतला याच वेळी पाथरी तालुक्याचे भुमिपूत्र असलेले स्व मुंडे यांचे विश्वासू साथिदार स्व  आशोक सेठ सामतांच्या माध्यमातून त्यांनी लक्ष्मीनगर लिंबा येथे योगेश्वरी शुगर्स या खाजगी तत्वावरील प्रतिदिन एक हजार टन ऊस गाळप करणा-या कारखाण्याची निर्मिती अवघ्या अकरा महिण्यात विक्रमी वेळेत केली. याच दरम्यान कल्यानराव फपाळ यांना येथील कारखाना साईट टायरगाडी प्रमुख म्हणून स्व आशोक सेठ सामत यांनी नियुक्ती दिली तेव्हा पासून आज तागायत आपली प्रामाणिक जबाबदारी ते पार पाडत आहेत. सेवा निवृत्ती नंतर ही त्यांना सेवेची संधी मिळालेली आहे. अनेकदा दोन्ही साखर कारखाण्यांना उसाची कमतरता असतांना त्यांना गेटकेन ऊस आणण्याची जबाबदारी निभवावी लागली. ती त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चोख पणे पार पाडली. नौकरी करत असतांनाच भाजपाचे संघर्षाच्या काळात त्यांचे पक्षवाढी साठी दिलेले योगदान ही मोठे आहे. अनेक वर्ष ते स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या सहवासात राहिले. बिड जिल्ह्याच्या या सुपूत्राने परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि जनतेची सेवा केली. आजही भाजपाचे निष्ठावान म्हणूनच त्यांना ओळखलं जातं मात्र भेदाभेद कधी या माणसाने केला नाही. स्व मुंडे कुटूंबाचे ते आजही कट्टर समर्थक आहेत. मितभाषी,संयमी असलेल्या कल्याणराव फपाळ यांचा सत्कार योगेश्वरी परिवारा कडून कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी करत त्यांच्या कारकर्दिचे कौतूक ही केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या