💥पैठण डावा कालव्यावरील लोहगाव उपविभाग मायनरची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी💥


परभणी - तालुक्यातील जायकवाडी पाटबंधारे विभागा अंतर्गत येणाऱ्या पैठण डावा कालव्यावरील लोहगाव उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पारडगाव मायनर वरील छोट्या उपचाऱ्या धरून १४ किलोमिटर  व ताडलिंबला - पाथरा मायनर उपचाऱ्या धरून ७ किलोमिटर ची दुरुस्ती तसेच गाळ काढून सिंचना साठी पाणी उपलब्ध करा या मागणीचे लेखी निवेदन या भागातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांना दिले होते त्या मागणीची तत्काळ दखल घेऊन या मागणीचे निवेदन या विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मयुरा जोशी यांना देऊन व मायनर ची पाहणी करून दि.१३.११.२०२१ रोजी पारडगाव मायनर वरील लोहगाव, झाडगाव, परळव्हाण, ताडलिंबला, मिरखेल व पिंगळी चा काही भाग तसेच ताडलिंबला - पाथरा मायनर वरील ताडलिंबला व पाथरा या भागातील व शिवारातील मायनर व छोट्या उपचाऱ्यांची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाच्या यंत्राद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सदरील काम सध्या अंतिम टप्प्यात असून पाणी सुटण्याच्या अगोदर या भागातील सर्व चार्यांची व उपचार्यांची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम पूर्ण होणार आहे.

अनेक वर्षापासून संबंधीत क्षेत्रातील कालवा व मायनरची दुरावस्था झाली होती अनेक ठिकाणी मायनर फुटले होते त्या शिवाय पाणी विसर्जित होणाऱ्या मायनरमध्ये गाळ साचल्याने मायनरच्या शेवटच्या टोकापर्यंत ( टेल पर्यंत पाणी पोहचत नव्हते. शिवाय उपचाऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व झाडे होती त्यामुळे वरील भागातील शेतकऱ्यांना मागील ६ ते ७ वर्षा पासून तर टेल ला मागील १५ वर्षांपासून जायकवाडीचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध  झाले नव्हते.

या दोन्ही मायनारची व छोट्या उपचार्यांची दुरुस्ती व गाळ काढल्या मुळे या परिसरातील पारडगाव मायनर वरील लोहगाव, झाडगाव, परळव्हाण, ताडलिंबला, मिरखेल व पिंगळी चा काही भाग तसेच ताडलिंबला - पाथरा मायनर वरील ताडलिंबला व पाथरा या भागातील व शिवारातील शेतकऱ्यांना सिंचना साठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण व जायकवाडी विभागाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित कामाचा प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, युवा आघाडी उपतालुका प्रमुख शेख खदिर शेख वजीर लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, सय्यद मुस्तफा, ताडलिंबला शाखा प्रमुख अंकुश खंदारे, आकाश नावळे, अरुण कांबळे, मीडिया प्रभारी नकुल होगे इत्यादी पाठपुरावा करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या