💥त्रिपुरा येथील 'त्या' घटनेच्या निषेधार्थ निवेदन....!


💥घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन💥

फुलचंद भगत

वाशिम:-देशातील त्रिपुरा राज्यामध्ये मुस्लीम समाज विरोधी संघटनेद्वारे मुस्लीम समाजाच्या धर्म विरोधात घोषणा देत आणि हिंसा करीत मस्जीदवर घात लाऊन हल्ला करण्यात आला आहे. व मुस्लीम समाजाच्या व्यक्तींची घरे ही जाडण्यात आली आहे. या घटनेचा हाजी मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली येथील नगर पालिकेतील नगर सेवक तसेच मुस्लिम समाजातील लोकांकडून निषेध करून या घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

           निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या देशातील त्रिपुरा राज्यात मागील 8 ते 10 दिवसा पासून मुस्लीम समाज विरोधी संघटनाद्वारे मुस्लीम समाज व त्यांच्या धर्मा विरुध्द घोषणा देऊन तांडव / हिंसा करीत मुस्लीमांची घरे जाळण्यात येत आहेत तसेच मुस्लीमांची धार्मिक स्थळांना लक्ष करून जवळपास 10 ते 15 मस्जीदांना जाळण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राज्यात संपूर्ण कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून मुस्लीम नागरीकांना लक्ष करून हिंसक हल्ले होत आहेत, त्यामुळे त्रिपुरा राज्यात मुस्लीम नागरीक दहशतीखाली असून तेथील मुस्लीम नागरीक कामावर जाण्यास घाबरत आहे परीणामी तो समाज आर्थिकटंचाईचा सामना करीत आहे. तरी आपणास सविनय विनंती की वरील प्रकरणामध्ये लिप्त समाज विरोधी लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जेणे करून समाजातील सांप्रदयीक सौहार्द कायम राहील, तसेच मुस्लीम समाजातील ज्या नागरीकांची घरे जाळण्यात आलेली आहेत आणि ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी तसेच त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नगरसेवक ऍड.फिरोज शेकूवाले,सलीम गारवे,जाकीर शेख,सलीम प्यारेवाले,अ.एजाज अ. मन्नान, युनूस पहेलवान, सैय्यद मुजाहिद, जुम्मा गारवे आदींसह बहुसंख्य नागरिकांची स्वाक्षरी आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या