💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाने दिलेले आश्वासन ठरले 'लबाडाचे औतान' ?

 


💥लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधकामाला अद्यापही सुरूवात नाही💥

पुर्णा ; शहरातील साठे नगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर मोडकळीस आले असून सदरील समाज मंदिराचे नव्याने बांधकाम अर्थात नुतनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील महिण्यात २० आक्टोंबर २०२१ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते राम रुपचंद जोनवाल व रवी बाबूराव गायकवाड हे नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसले होते यावेळी पुर्णा नगर परिषद प्रशासनाने संबंधित उपोषणार्थींना तात्काळ उपोषण उठवण्याची विनंती करीत २० आक्टोंबर २०२१ रोजी जा.क्र./नपपु-२/४१०५/२०२१ अनुसार लेखी स्वरूपात आश्वासन देऊन येणाऱ्या १५ दिवसात साठे नगर परिसरातील मोडकळीस आलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर पाडून नवीन बांधकामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिले होते.


परंतु नगर परिषद प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन निव्वळ 'लबाडाचे आवतान' ठरले असून या घटनेला दिड महिण्याचा कालावधी होत असतांना या संदर्भात ना नगर परिषद प्रशासनाने कुठलेही ठोस पाऊल उचलले ना संबंधित प्रभागातील अकार्यक्षम लोकप्रतिनिधींनी त्यामुळे परिसरातील नगरीकांमध्ये संताप व्यक्त होत असून दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधी रुपयांच्या निधीची विकासाच्या नावावर स्मशानभुमीत निर्मनूष्य वसाहतींमध्ये तसेच आवश्यकता नसलेल्या ठिकाणी थातुरमातूर निकृष्ट दर्जाची विकासकाम दाखवून विल्हेवाट लावणाऱ्यांनी जाणीवपूर्वक या मोडकळीस आलेल्या अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या नुतनीकरणाकडे दुर्लक्ष करून स्वतःतील जातीयवादी नितिमत्ता उजागर केल्यामुळे तिव्र असंतोष व्यक्त केला जात आहे नगर परिषद नगराध्यक्षा एकलारे यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांनी उपोषणार्थी सामाजिक कार्यकर्त्यांसह संपूर्ण मातंग समाज बांधवांना लेखी स्वरूपात दिलेले आश्वासन फोल ठरले असून हा भोळाभाबडा समाज पुन्हा एकदा लबाडांच्या आवतानाला बळी पडल्याचे निदर्शनास येत आहे.... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या