💥मंगरुळपीर तालुक्यात देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर यांचा नुकसान पाहणी दौरा...!


💥शेतकर्‍यांची व्यथा जाणुन घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांचा जिल्हा दौरा💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-परतिच्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतातच नव्हे तर डोळ्यातही पाणी आले आहे.अशा परिस्थितीत शेतकर्‍यांची व्यथा जाणुन घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस आणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वाशिम जिल्हा पिक नुकसान पाहणी दौरा आयोजीत केला होता.


            विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील शिवणी येथे नुकसान झालेल्या शेतीचीपाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी संगीतल्यानुसार अजून पंचनामे झाले नाहीत आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत.त्यामुळे मी जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे यासाठी सरकारला कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या