💥एक दिवस अन्नदात्यासाठी ; शहरवासीयांनो बळीराजाच्या लढ्यात साथ देऊन कृतज्ञता व्यक्त करा -- रविकांत तुपकर


💥रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चाचे💥

बुलढाणा :सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू, शेतकरी म्हणून एकत्र येवू’ असा नारा देत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरुच असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

आधी कोरोना आणि त्यानंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांना हतबल केले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून सोयाबीनचे दरही आता कोसळले आहेत. तब्बल ११ हजार रुपयांवरुन हे सात हजारांवर आले आणि जेव्हा अतिवृष्टीतून कशीबशी वाचलेली थोडीफार सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला सोयाबीनचे दर अकरा हजारांवरून चार हजारांपर्यंत आले आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल व इतर महागाई वाढत असल्याने संसाराचा गाडा चालवावा तरी कसा? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आहे. या संकटांमुळे शेतकरी पुरता खचला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांची मुलं, मुली देखील आता आत्महत्या करु लागले आहेत. या कठीण प्रसंगी सर्वांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ३१ ऑक्टोबर रोजी ‘एल्गार मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वकील, डॉक्टर, साहित्यिक, विचारवंत व्यावसायीक, उद्योजक आणि शहरवासीयांनी शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना आधार आणि प्रत्यक्ष कृतिशील पाठिंबा दर्शवत बळीराजाला साथ द्यावी, असे भावनिक आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या