💥पुर्णा तालुक्यातील देगाव येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या...!


💥शेतकरी गजानन गव्हाणे यांनी आपल्या रहात्या घरी हूकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली💥

पूर्णा (दि.२३ आक्टोंबर) तालुक्यातील देगाव येथिल शेतकरी गजानन बालाजी गव्हाणे (वय 35) यांनी सततच्या नापिकी ओला कोरडा दुष्काळ अदी कारणाने आर्थिक व्यवहाराची घडी बसवता आली नाही कर्जाला कंटाळून  शुक्रवारी (ता .22)  पहाटे  आपल्या रहात्या घरी हूकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

        गजानन बालाजी गव्हाणे (वय ३५) रा.देगांव ता.पूर्णा जि.परभणी असे मयत शेतकऱ्याचे नाव असून, याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात आत्महत्येच्या घटनेची नोंद  करण्यात आली आहे.गजानन गव्हाणे याना पत्नी दोन मुले ,आई असा परीवार आहे . देगांव (तेल्याचे) शिवारातील गट नं १० व ३४ मध्ये पावणे तीन एकर शेती असून  त्यांनी शेतीवर पुर्णा स्टेट बँक शाखेचे १ लाख ०९ हजार रुपयांचे तर महींद्रा फायनान्स कडुन दिड लाख रुपये असे एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचेकर्ज घेतले होते.मागील चार ते पाच वर्षांत कोरडा दुष्काळ तसेच दोन वर्षांपासून सातत्याने होणारी अतीवृष्टी यामुळे झालेली शेतातील उत्पन्न घटले. कर्ज परत फेड कसे करणार याच विच्यारातुन शुक्रवारी सकाळी ५  वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या रहात्या घराच्या छताच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार त्यांच्या पत्नीने पाहीला परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. याबाबत पूर्णेत त्यांचे नातेवाईक लक्ष्मण बळीराम गव्हाणे यांच्या खबरी वरुन कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या