💥परभणी जिल्ह्यातील अवैध सावकारांनो सावधान ; परभणीत अवैध सावकारी बद्दल दोघांच्या विरोधात कारवाई...!


💥दोन्ही कारवाईत झडतीमध्ये अवैध सावकारी संबधाने काही दस्ताऐवज आढळून आलेले आहेत💥

परभणी (दि.०५ आक्टोंबर) : परभणी जिल्ह्यात सर्वत्र अवैध सावकारीचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात बोकाळला असून सावकारी संदर्भातील कुठलाही शासकीय परवाना नसतांना बेकायदेशीरपणे सावकारी करीत शेकडा दहा ते पंधरा टक्क्यांनी रक्कम देऊन शेती घर किंवा प्लॉटची रजिष्ट्री करून सोने/चांदी दागदागीने गहाण ठेवून घेऊन संबंधित कर्जदाराची संपत्ती लुबाडण्याचे प्रकार अवैध सावकारांनी चालवले असतांना तालुकास्तरीय सावकारी विभाग मात्र आर्थिक हितसंबंध जोपासत अवैध सावकारीला खतपाणी घालीत असल्याचे गंभीर प्रकार यापुर्वी जिल्ह्यात घडतांना पाहावयास मिळाले परंतु जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेत कर्तव्यकठोर अधिकारी आल्याने जिल्ह्यातील अवैध सावकारांनी आता वेळीच सावधान झालेले बरे नसता अवैध सावकारांना आता कालकोठडीत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व पोलिस यंत्रणेने काल सोमवार दि.०४ आक्टोंबर २०२१ रोजी कायद्याचा फास आवळत अवैधरीत्या सावकारी करणार्‍या परभणीतील दोन अवैध सावकारांच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई करीत खळबळ उडवून दिली आहे.

परभणीच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल,विभागीय सहनिबंधक  योगीराज सुर्वे व अनिलकुमार दाबशेड, पोलीस अधिक्षक जयंत मिना व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभाग व पोलीस विभागीतील अधिकारी व कर्मचा यांच्या यांचे तिन पथक तयार करुन संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. नवा मोंढा येथील राजु रामलाल जैस्वाल यांच्या ग्रो एजन्सी दुकानामध्ये व त्यांच्या रहातेघरी दोन पथकाव्दारे धाडी टाकुन घरझडती घेण्यात आली. या घर झडतीमध्ये खरेदीखते / इसारपावत्या / करारनामे इत्यादी बाबी जैस्वाल अ‍ॅग्रो एजन्सी दुकानामध्ये आढळून आल्या.  तसेच रहात्याघरीही अशाच प्रकारची दस्ताऐवज आढळुन आली. तसेच दुसर्‍या कारवाईत गौतम नगर येथील प्रविण मोरे यांच्या घरी धाड टाकूण झडती घेण्यात आली. झडतीमध्ये अवैध सावकारी संबधाने काही दस्ताऐवज आढळून आलेले आहेत....

       या दोन्ही कारवाईत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक उमेशचंद्र हुशे, कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक एस व्ही अब्दागिर, बी. एस. नांदापुरकर, सावकारी शाखा प्रमुख डी जी पठाण, भाऊराव कुरुडे यांच्या नियोजनाखाली पथक प्रमुख म्हणून  सहाय्यक निबंधक एस. एन. तायडे व पथकातील सदस्य पी. बी. राठोड, डी. जी. पठाण, एस. पी. बाशवेणी, श्रीमती देशपांडे, पोलीस कर्मचारी एस व्ही नागरगोजे, श्रीमती टि. जी. चोपडे, आर. व्ही. भोसले तर पंच म्हणून  दत्तात्रय वामनराव लंगोटे यांनी गौतम नगर येथील पथकामध्ये कामगिरी पार पाडली. तर नवामोंढा येथील झडतीमध्ये पथक प्रमुख म्हणून एस. एन. तायडे, सदस्य म्हणून पी बी. राठोड, डी.जे. पठाण, एस. पी. बाशवेणी, श्रीमती एस. व्ही. देशपांडे तर पोलीस कर्मचारी एस. वाय. आगळे, श्रीमती तस्लीम शेख व पंच म्हणून पी. एस. रगडे यांनी कामगिरी पार पाडली. तसेच नांदखेडा रोड येथील पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून नानासाहेब कदम, तर सदस्य म्हणून श्रीमती ए . जी. निकम, स. जावेद, पी. जी. बाहेकर, ए. के. कदम, एस. बी. लोणीकर, विजय देखणे तसेच पोलीस कर्मचारी शेख इब्राहिम, अहिल्या जाधव,  शासकीय पंच म्हणून श्री सूर्यकांत वाव्हळे यांनी कामगिरी बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या