💥डॉ.आत्माराम टेकाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट स्पोर्ट्स टीचर अवॉर्ड' ने सन्मानित...!


💥आविष्कार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला💥

सिरसाळा (वार्ताहर): येथील श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. आत्माराम टेकाळे यांना आविष्कार सामाजिक व शैक्षणीक संस्थें द्वारा दर वर्षी दिला जाणारा 'बेस्ट स्पोर्ट्स टीचर अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले.

आविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली १५ वर्ष कार्यरत आहे. विधायक दृष्टीकोन ठेऊन संस्थेच्या वतीने अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबविले जातात. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आणि विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तीस संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येतो.

संस्थेच्या वतीने दरवर्षी  ५ ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. देशभरातील शिक्षकांचा सन्मान या निमित्ताने केला जातो.

दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ आत्माराम टेकाळे यांना त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, अंतरविद्यापिठीय स्तरावरील अनेक खेळाडूंना, संघाना प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध क्रिडा समित्यावर भरीव कार्य केल्या बद्दल "आविष्कार सामाजिक व शैक्षणीक संस्थें" द्वारा २०२०-२१ चा 'बेस्ट स्पोर्ट्स टीचर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री व्यंकटराव कदम साहेब, उपाध्यक्ष मा. श्री नंदकुमार सारडा, सचिव प्रा. योगेश कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ. हरीभाऊ कदम तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या