💥अकोल्यात 'रक्षकच निघाला भक्षक' ; स्थानिक गुन्हे शाखेच्या बहाद्दरांनी रातोरात आवळल्या आरोपींच्या मुसक्या...!


💥या घटनेतील तिघा आरोपींसह लक्झरी बसच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली💥

 अकोला ; सर्वसामान्य जनतेसह त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची सर्वस्वी जवाबदारी असलेल्या पोलिस प्रशासनातील रक्षकच जेव्हा भक्षक बनून जनसामान्यांच्या मालमत्तेला असुरक्षीतता निर्माण करीत असेल तर विश्वास तरी करायचा कोणावर ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना अकोल्यात घडली असून अकोल्यात पोलिस प्रशासनाच्या खाकी वर्दीला कलंकीत करण्याचा गंभीर प्रकार पोलिस दलात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने केल्याची घटना घडली असून संबंधित पोलिस कर्मचारी व त्याच्या तिघा सहकार्यांनी संगनमत करून  गुरुवार दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८-०० वाजताच्या सुमारास अकोल्या पासून काही अंतरावर असलेल्या रिधोरा येथे बस थांबवून त्यातील एकाला लुटल्याची गंभीर घटना घडली या लुटीत ५० लाखांची रोकड घेऊन तिघेही पसार झाले. मात्र अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या बहाद्दर शिपायांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून रातोरात घटनेतील कर्मचाऱ्यासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या तिघांसह लक्झरी बसच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली.

या दरोड्यात रामविलास उर्फ राम गोविंद पवार (वय ३३ रा. धाबेकर नगर खडकी) हा पोलिस कर्मचारी असून तो काही दिवसांपासून तो रजेवर आहे. त्याने यशपाल मदनलाल जाधव (वय २८ रा. कमला नेहरू नगर), तनवीर खाॅ उर्फ सोनू जहॉगिर खाॅ (वय २५ रा. गंगा नगर वाशिम बायपास) आणि व्यवस्थापक अमित उर्फ पिंकू प्रेमशंकर मिश्रा वय २८ रा. संतोष नगर खडकी यांच्या मदतीने दरोडा टाकला.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ईश्वरदास भेराराम देवाशी वय २०. रा. माटुडा बोळी जि. बाडमेर राजस्थान ह.मु. बालाजी रेल्वे स्टेशन रोड अकोला हा ५० लाख रुपये घेऊन रामलता येथील लक्झरी स्टॅण्डवर पोहचला असता तेथून तो राणा ट्रॅव्हल्स मध्ये बसला आणि मुंबईसाठी निघाला होता. लक्झरी बस रिधोऱ्याच्या समोर थांबली असता बसमध्ये एक आरोपी घुसला. इश्वरदास कोण है असे म्हणून त्याने इश्वरदासला खाली खेचले. खाली उभे होतेच. त्या तिघांनीही ईश्वरदासला मारहाण केली आणि त्याच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळून गेले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या