💥वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव येथील प्राथमिक शिक्षिका मिनाक्षी नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित...!


💥त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक,सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव, जिल्हा वाशिम येथे कर्मयोगी कै.प्रल्हादराव काळबांडे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ८ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना कार्यगौरव/सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव येथील प्राथमिक शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक, सामाजिक कार्याबद्दल, लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती केल्याबद्दल कर्मयोगी कै.प्रल्हादराव काळबांडे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्काराने  रमेश तांगडे(शिक्षणाधिकारी वाशिम), डॉ.उध्दव गाडेकर(आजिवन प्रचारक,गुरूकुंज आश्रम मोझरी) आमदार अॅड किरणराव सरनाईक,प्रा.भरत आव्हाळे सर,प्रा.योगेश निकस सर,शिवश्री नारायणराव काळबांडे सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना कार्यगौरव पुरस्कार,शाल, ग्रामगीता ग्रंथ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कै.प्रल्हादराव काळबांडे साहेब यांचे स्वप्न सत्यात उतरवणारी स्वामी विवेकानंद विद्यालय हे खरोखर प्रशंसनीय आहे.स्वच्छ, सुंदर शाळा,  बाग बगिचा बघितला की एखाद्या गुरूकुलात किंवा आश्रमात असल्याचा भास होतो.कै.प्रल्हादराव काळबांडे साहेबांनी पस्तीस वर्षापुर्वी लावलेल्या लहान रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.त्याच्या असंख्य फांद्या म्हणजे त्या विद्यालयातील हजारो विद्यार्थी आज प्रशासकीय, शासकीय व अनेक क्षेत्रात पसरलेले आहेत.त्याग,सेवा आणि समर्पण वृत्ती असणारे कै.प्रल्हादराव काळबांडे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त होतकरू आदर्श शिक्षकांना कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.मिनाक्षी नागराळे यांनी आजपर्यंत अनेक शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती,शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली ऑफलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तंबाखू मुक्ती उपक्रम,गोष्टीचा शनिवार, रविवार माझा आवडीचा, दप्तर मुक्त शाळा,पक्षी वाचवा,lfw चा इंग्रजीचा उपक्रम यामध्ये सात हजार रुपयाचे पुस्तक बक्षिस म्हणून जिंकले.इतकेच नव्हे तर कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळा रंगरंगोटी करून शाळेचे रूपडे बदलून टाकले.कोरोना काळात राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका-समुहामध्ये राज्यातल्या  शिक्षिका भगिनींना तंत्रज्ञानाची कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञानाचे धडे दिलेत.मिनाक्षी नागराळे यांनी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकाव्यसंग्रह उमलती फुले स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचा चिमणी पाखरं आणि स्वराज्याचे मावळे असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.ज्याची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.शैक्षणिक व साहित्यिक कार्याबद्दल जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्कार मिनाक्षी नागराळे यांना मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या