💥कृषीपंप व ग्रामीण भागातील घरगुती विजबिलाची सक्तीची वसुली तात्काळ थांबवून वसूलीस सहा महिन्याची मुदतवाढ द्या...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदनाद्वारे मागणी : अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा दिला इशारा💥

परभणी - जिल्हयामध्ये सलग पाच वेळा अतिवृष्टी झाल्याने जिल्हयातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे. मुळात शेती व्यवसायावरच ग्रामीण भागाचा आर्थिक गाडा चालतो. महावितरणद्वारा सध्या जिल्हयामध्ये ग्रामीण भागात कृषी ग्राहक व घरगुती वापराचे विज वापरणाच्या ग्राहकांची सक्तीने वसुली सुरु केली आहे. शेतामधील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ग्रामीण भागात आर्थिक तंगी निर्माण झाली आहे त्यामुळे इच्छा असुनही विज बिलाचे पैसे भरण्यास ग्रामीण भागातील शेतकरी ग्राहक असमर्थ आहेत.


सक्तीने वसूली करणे बाबत सध्या परभणी तालुक्यातील झाडगाव, पाथरा तालिमला, लोहगाव समसापूर, वाडीदमाई, साडेगाव, साटला, धार, मांगणगाव या गावांसह जिल्हयातील जवळपास सर्वच गावामध्ये महावितरणच्या वतीने ग्रास पंचायत कार्यालयावर नोटीस लावण्यात आलेली आहे. या नोटीसीनुसार तात्काळ विज बिल भरणा न कल्यास घरगुती विज पुरवठा तसेच कृषी विद्युत रोहित्र बंद करण्याची धमकी महावितरण कंपनीद्वारे सदरील नोटीसीमध्ये देण्यात आली आहे. जिल्हामध्ये अतिवृष्टी झालेली असताना महावितवरणद्वारे सुरु करण्यात आलेले ग्रामीण भागातील कृषी पंपाचे विज बिल के घरगुती बिज बिल सक्तीची वसुलीची कार्यवाही निषेधार्य आहे शासनाकडून झालेल्या अतिवृष्टीबाबत अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. करिता कृषीपंप व ग्रामीण भागातील घरगुती विजबिलाची सक्तीची वसुली तात्काळ थांबवून वसूलीस सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

मा. जिल्हाधिकारी मॅडम या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आहेत या नात्याने महावितरण कंपनीला अतिवृष्टी व आपत्ती या कारणामुळे ग्रामीण भागातील कृषीपंप व घरगुती वापराच्या विजबिलाची सुरु असलेली सक्तीची वसूली तात्काळ थांबवून त्यांना ग्रामीण भागातील कृषीपंप व घरगुती वापराच्या विजविल भरण्यासाठी किमान सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी सूचना महावितरण ला करावी. या उपरही महावितरण कंपीनीने ग्रामीण भागातील कृषीपंप व घरगुती वापराच्या विजबिलाची सक्तीची वसुली करण्याचा प्रयत्न केल्यास महावितरण कार्यालय , परभणी च्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष मोठे जनआंदोलन उभे करेल व त्यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत अधिक्षक अभियंता , परभणी मंडळ कार्यालय , महवितरण परभणी हे जबाबदार असतील असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, युवा आघाडी लोहगाव सर्कल प्रमुख ओमकार खटींग, ताडलिंबला शाखा प्रमुख अंकुश खंदारे व पाथरा शाखा प्रमुख रामेश्वर जाधव, वैभव संघई, सुधीर देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या