💥घर बंद असल्याची संधी साधत चोरांनी मारला डल्ला,पोलिस तपास सुरु....!


💥दरवाज्याचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांची चोरी💥

वाशिम:-मंगरुळपीर येथे दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचांदीचे ७२ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना ता ९ चे रात्री स्थानिक लक्ष्मीविहार कॉलनीत घडली आहे. 

                पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष प्रल्हाद चव्हाण वय ४५ वर्ष, रा लक्ष्मी विहार कॉलनी मंगरुळपीर यांनी ता १० रोजी पोलिसांत तक्रार दिली की, मी माझ्या चिखलागड गावाला माझे वडील मरण पावल्याने माझे घरातील काही सामान घेवुन  गावी राहण्याकरीता गेलो होतो. दि ९ रोजी मी मंगरुळपीर येथे घरी आलो व संध्याकाळी चिखलागड येथे गेलो. दि १० रोजी सकाळी मंगरुळपीर येथे घरी आलो असता माझ्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसले. मी आत मध्ये जावुन पाहनी केली असता माझ्या झोपण्याच्या खोली मधील कपाटामधील कपाटाचे लाँक तोडुन सर्व सामान अस्ताव्यस्त करुन कपाटामधील १२ ग्रॅम सोन्याची चैन व ५ ग्रॅमचे मनी व मुलीच्या पायातील  चांदीच्या पैजन / तोरड्या  असा एकुण ७२ हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमाने लंपास केला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या