💥परळी वैजनाथच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा.....!


💥राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत श्रीनिवास कदम याने पटकावले सुवर्णपदक💥 

परळी (प्रतिनिधी) - नॅशनल न्यूज स्पोर्टस अँड एज्युकेशन फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप स्पर्धेतील 65 किलो वजनी गटातून श्रीनिवास देवराव कदम या विद्यार्थ्याने कुस्तीत सुवर्ण पदक पटकावले आहे. श्रीनिवास कदम याने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा गौरवला गेला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.


चौथ्या राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा येथे नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये कुस्ती प्रकारात परळीला अभिमान वाटेल अशी कामगिरी युवा कुस्तीपटू श्रीनिवास कदम याने करून दाखवळी आहे. 65 किलो वजनी गटातून त्याने सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये देशभरातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते श्रीनिवासा गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर भारतातील कुरुक्षेत्र येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर विविध जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा अनेक स्पर्धांमधून तो खेळतोय. परळीतील सामाजिक कार्यकर्ते देवराव कदम यांचा तो मुलगा आहे. मिळवलेल्या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना तो म्हणाला की, प्रचंड मेहनत, सातत्य आणि जिद्द यांच्या बळावरच हे यश मिळू शकले आहे. माझ्या यशासाठी माझ्या आई-वडिलांनी मला खूप पाठबळ दिले अशा भावनाही त्याने बोलून दाखवल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या