💥युवासेना प्रसिद्धीप्रमुख गौरवकुमार इंगळे यांच्या पुढाकाराने शेतातील रस्त्याचा प्रश्न सुटला...!


💥यापुढेही सामाजीक बांधिलकी जोपासत लोकसेवेसाठी तत्पर💥

💥खा.भावनाताई गवळी यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनात सदैव लोकहिताचे काम करन्याचा माणस💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर ते मानोरा राष्ट्रीय महामार्गावरील पेठ खदानपूर परिसरात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा रस्ता महामार्गातील चुकीच्या कामामुळे गेल्या अनेक महिन्यापासून बंद झाला होता यावर सदर शेतकऱ्यांनी सर्जन इन्फ्रा कॉन कंपनी कॅम्प साखरडोह तालुका मानोरा येथे तसेच तहसीलदार कार्यालय मंगरूळपिर याठिकाणी निवेदन दिले संबंधित विषयावर मंगरूळपीर चे तहसीलदार यांनी 13/07/ 2021 ला सर्जन इन्फ्रा या कंपनीला शेतकऱ्यांचा रस्ता पूर्ववत करून देण्याचे सूचना दिल्या होत्या. परंतु तब्बल तीन महिने उलटूनही कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी शेतकऱ्यांचे रस्ता पूर्ववत करून देणे गरजेचे समजले नाही असे दिसले. खरिपाचा हंगाम असल्याने व सोयाबीन पिकाची काढणी जवळ आल्याने शेतामध्ये हार्वेस्टर तसेच ट्रॅक्टर सारखे यंत्र जाणे शक्य नव्हते सदर बाबीने त्रासून संबंधित शेतकरी यांनी त्यांची व्यथा युवासेना प्रसिद्धीप्रमुख तसेच खासदार भावनाताई गवळी यांचे समर्थक समजले जाणारे गौरव कुमार इंगळे यांना सांगितली.सामाजिक बांधिलकी जपत इंगळे यांनी सदर प्रकरणाचा जोरदार मागोवा घेतला आणी पाठपुरावाही केला. राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण तसेच सर्जन इंद्राच्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत प्रशासनाकडे रस्ता पूर्ववत करण्यासाठी वारंवार मागणी केली व त्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून रस्ता पूर्ववत झाला तसेच अडचणीच्या ठिकाणी दोन मोठे पाईप बसवण्यात आल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी गौरवकुमार इंगळे यांचे आभार मानले.यावेळी वाहेद खा अजीज खा,नाजीम खा वाहेद खा,वाजिद खा वाहेद खा,काझिम खा वाहेद खा,अब्दुल हमिद मो.निजाम,नासिर,मो.रशिद निजाम,गजानन खोडके,पप्पु खोडके,दंडे,मो.जफर,मुरली बुधे,मो.हनिफ,मो.सत्तार शेख अहमद,नावेद शेख,फैजान खान,शुभम ठाकुर आदींची ऊपस्थीती होती.

 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र जपत आम्ही सामाजिक बांधिलकी जपत राहू खासदार भावनाताई गवळी यांचे नेतृत्वात यापुढेही लोकोपयोगी उपक्रम राबवित राहू व त्यासाठी आंदोलन पवित्रा घेण्याचे काम पडले तरी ते आमचे भाग्यच.

- गौरवकुमार इंगळे युवासेना वाशिम जिल्हा प्रसिद्धीप्रमुख


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या