💥पुर्णा तालुक्यातील अतिक्रमित जमिन प्रकरणात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ताडकळस बाजार समितीला दिली भेट...!


💥गायरान जमिनीवर निवासस्थान उभारलेल्या गरीबांचा संसार उघडयावर आणणार काय ? 

पुर्णा (दि.२० आक्टोंबर) - ताडकळस गायरान जमीनीवर ग्राम पंचायतीने विविध योजनां अंतर्गत दिलेल्या अनुदानातून मागील अनेक वर्षांपासून उभारलेल्या गोरगरीबांच्या निवासस्थानांना येथील कृषि उत्पन्न बाजार समितीने बेकायदेशीरपणे अतिक्रमण दाखवून त्या विरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर आज बुधवार दि.२० आक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी थेट ताडकळस बाजार समिती गाठून पाहणी केली.

      ताडकळस येथील गट क्रमांक ३१२ मधील ७ हेक्टर ५० आर जमीन असून या पैकी ३ हेक्टर ५० आर जमीन बाजार समितीच्या ताब्यात आहे. त्यावर बाजार समितीने भूखंड तयार करुन ते लीजने भाडेतत्वावर दिले आहेत. त्यावर अनेकांनी पक्की बांधकामे करून व्यवसाय सुरु केले असल्याचे ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणने आहे या विरोधात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर १२ एप्रिल २०२१ रोजी बाजार समितीचे अधिकार रद्दबातल केल्या गेले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी गोयल यांनी आज बुधवारी ताडकळस बाजार समितीस भेट दिली. तसेच काहीं लोकां बरोबर चर्चा केली.

 या गायरान भुखंडावर मागील अनेक वर्षांपासून विविध शासकीय योजनांतील अनुदानातून निवासस्थान बांधून राहणाऱ्या गोरगरीब रहिवास्यांनी या पुर्वीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार देऊन या भुखंडावरील रहिवासी नागरिकांना उठवून त्यांचे संसार उघड्यावर आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शना आणून दिले होते वास्तविक पाहता जिल्हाधिकारी गोयल यांनी या गायरान जमिनीवरील बाळराज नगर मधील रहिवासी नागरिकांशी चर्चा आवश्यक होते असे नागरीकांचे म्हणने आहे यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट दिली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धुतराज, वैद्यकीय अधिकारी कल्पना आळणे, आरोग्य सेविका माधुरी खोत, गुरव, गोपाळ साखरे, शेख जमील यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. लसीकरणाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा केली.

********************************************

💥गायरान जमिनीवर निवासस्थान उभारलेल्या गरीबांचा संसार उघडयावर आणणार काय ? 


पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे गायरान जमीन गट क्र.३१२ मध्ये बाळराज नगर चा भाग येतो, या बाळराज नगर मध्ये लोकांना अंदाजे १९८६ साली शासनाने इंदिरा आवास योजने अंतर्गत कच्या स्वरूपाचे विटा मातीचे घरकुल दिले होते. १९९३ साली किल्लारी येथे भूकंप झाला होता, दुर्दैवाने परभणी जिल्ह्यात ही भूकंप झाला तर, कोणती जीवितहानी होऊ नये’ या उद्देशाने शासनाने ४ गोलघर (डोम ) घरकुल म्हणून दिले होते. पण ते कालांतराने पडल्यामुळे, या ठिकाणी कोणी नवीन तर कोणी जुने घर बांधले आहेत. कोणाला नवीन घरकुल ही मंजूर होऊन त्याचे बांधकाम सुरु आहे, अशा परीस्थित पूर्णा तहशिलदार यांच्या कडून अतिक्रण हटवा अशा प्रकारच्या नोटीस प्राप्त झाल्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे बरेचशे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब नादत असून, त्यांची “गावात गेलं तर घर नाही, अन्न वनात गेलं तर शेती नाही” अशी अवस्था होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याची घोषणा केली होती. पण या पूर्णा तहशिलदार यांच्या कडून आलेल्या  अतिक्रण हटवा या नोटीस मुळे २०२२ पर्यंत बाळराज नगर मधील नागरिक बेघर होतात कि काय हीच चिंता निर्माण झाली आहे. 


*********************************************   

 दरम्यान, या दौर्‍यात बाजार समितीचे सभापती अजित वरपुडकर, सचिव माणिक चौधरी, पाटबंधारे खात्याचे शाखाधिकारी दिलीप शिंदे, सरपंच गजानन आंबोरे, माजी सरपंच बालाजी रुद्रवार, कामाजी आंबोरे, माजी सभापती रंगनाथराव भोसले, माखणीचे सरपंच गोविंदराव आवरगंड, ज्ञानोबा घोडके आदींनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या