💥पालकांनी मुलांच्या शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे - सहायक पोलिस निरिक्षक प्रवीण सोमवंशी


💥जी चॅम्प अबॅकस पाथरी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धे प्रसंगी बोलतांना सोमवंशी म्हणाले💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-पालकांनी मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे, तरच आपली मुले आजच्या स्पर्धेत टिकतील असे मत पाथरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.शिवराज नाईक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष परभणी  सुभाष आंबट, इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या दुर्गा चव्हाण, उपसरपंच दिगंबर लिपणे, सिताराम नाईक,सतिश तारे यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

जी चॅम्प अबॅकस पाथरी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येथील संस्कार महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. पुरस्कार प्राप्त मुलांना याप्रसंगी ट्रॉफी प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. शालेय जीवनात अबॅकस हे साधन अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे घडून येतो.आकलन, स्मरणशक्ती, आत्मविश्वास,वेग अचुकता यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उत्तम मार्ग आहे,असे पुढे बोलताना त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी चॅम्प पाथरीच्या केंद्र संचालिका सौ.अयोध्या तारे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सोनाली नाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रल्हाद गिराम यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या