💥मंगरूळपीर येथे लखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद....!


💥लखीमपूर घटनेचा केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत केला जाहीर निषेध💥


(फुलचंद भगत)

मंगरुळपीर:-मंगरुळपिर येथील अकोला चौकात दि. 11 रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने मंगरुळपिर बंदचे आवाहन करून केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला.यादरम्यान अकोला चौकात व धानोरा येथे रस्ता रोको करण्यात आला मंगरूळपीर मध्ये महा विकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला असून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.


                शेतकऱ्यावर वेळोवेळी संकटे येत असून शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नाही. एकीकडे शासन गोरगरिबांच्या घरी मोफत सिलेंडर देत असून सध्या सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत पुन्हा एकदा गरीबाच्या घरी चुली पेटत असून सिलेंडरचा भडका झाला आहे लखीमपुरी खेरी मध्ये शेतकऱ्याला एका बड्या नेत्याच्या मुलाने गाडीने चिरडले असून शेतकऱ्यांचा यामध्ये हकनाक बळी गेला आहे. या सर्व मागण्या घेऊन महा विकास आघाडीच्या वतीने मंगरूळपीर शहरात बंद पाळून रास्ता रोको करण्यात आला आहे.यावेळी काँग्रेसचे जावेद सौदागर मिलिंद, पाकधने  मा,नगरसेवक उबेद बेग,सय्यद आझम, आर.के. राठोड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, सचिन राऊत,सलिम जहागीरदार, अब्दुल सादिक, मुख्तार पटेल, अन्सार खा,अ रझाक, उबेद इनामदार, फकिरा श्रुगारे,गोपाल सावके, सुनिल मिसाळ, आयुष पाकधाने,सचिन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष ज्योती ताई ठाकरे,युवती जिल्हाध्यक्ष नूतन राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी बनसोडे, शशिकला कोकरे,सुरेखा ठाकरे,जाधव, पुरोहित, सह राष्ट्रवादी काँग्रेस शेकडो कार्यकर्ते रस्ता रोको मध्ये सामील होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या