💥बिड जिल्ह्यात विविध पक्षातील नेत्यांचा समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश...!


💥काँग्रेस हा सर्वसमावेशक आणि सक्षम राजकीय पर्याय वाटू लागल्याने इनकमिंग वाढले - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई (वार्ताहर) - देशात व राज्यात काँग्रेस हा सर्वसमावेशक आणि सक्षम राजकीय पर्याय वाटू लागल्याने काँग्रेस मध्ये इनकमिंग वाढले आहे.दररोज विविध पक्षातील अनेक नेत्यांचे समर्थकांसह काँग्रेस पक्षात इनकमिंग होत आहे.अंबाजोगाईत रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अनेकांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.काँग्रेस मध्ये प्रवेश करणारांचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सहर्ष स्वागत केले.


बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार,दिनांक २४ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून विविध पक्षातील नेते आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात दाखल होत आहे.त्यामुळे काँग्रेस संपली ही केवळ आता अफवाच वाटू लागली आहे.अंबाजोगाईत कार्यकर्ता मेळाव्यातून काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.मेळाव्यात प्रवेश सोहळ्याचे सुञसंचालन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले.बीड जिल्ह्यातील शिवक्रांती संघटनेचे प्रमुख नेते गणेश बजगुडे पाटील (बीड) हे आपल्या असंख्य समर्थकांसह,युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.किरण सोनसळे,अंबाजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख नबी शेख चाँद,सामाजिक कार्यकर्ते मुनीर मुसासेठ कुरेशी,बारा बलुतेदार महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस एॅड.अरविंद मोटेगांवकर,अन्वरभाई कुरेशी,बाबासाहेब रामकिसन,केज तालुक्यातील उंदरी ग्रामपंचायतचे सरपंच संतोष ठोंबरे,सदस्य नितीन ठोंबरे,मुन्ना ठोंबरे,ञिंबक ठोंबरे,सखाराम गरडे,बंडू बप्पा ठोंबरे,किशोर ठोंबरे,चंद्रकांत ठोंबरे,महादेव सत्वधर,भागवत ठोंबरे तसेच कानडीबदन ग्रामपंचायतचे सरपंच महादेव पौळ,सर्जेराव नाईकवाडे,रवि चाटे,गजानन साखरे,दत्ता नांदवटे,सुशिल माचवे,प्रविण खोडसे(नायगाव),अमोल गोरे(धनेगांव),राम शेलार (बनसारोळा),संतोष जोगदंड (कौडगाव),बाळासाहेब पौळ(बोरी सावरगांव),नितीन धायगुडे (केकत सारणी),अमोल थोरात(बनकरंजा),अशोक हांडीबाग(आणेगाव),परमेश्वर फसले(औरंगपूर),बंडू राऊत (कानडीमाळी),धारूर तालुक्यातील सुरेश यादव,आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब सुबे,संतोष ओव्हाळ,शहानवाज पठाण,माजलगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते महावीर मस्के,माजी पंचायत समिती सदस्य प्रा.रामेश्वर मगर,माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळंके,किशोर सोळंके,रामराव शेंदरे पाटील,दत्ताभाऊ राठोड (लवूळ),रोशनपुरीचे सरपंच उध्दव काका,प्रा.शिवाजीराव लाटे,माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सोळंके,परळी तालुक्यातील विष्णु गित्ते यांनी ही आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळेस बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने भारतीय जनतेचा विकास करणारा पक्ष असल्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेस मध्ये केले जाते.सर्वांच्या विकासाठी तत्पर काँग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे,पुढील काळात बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध पक्षात,संघटनेत काम करणारे अनेक मातब्बर नेते,पदाधिकारी हे आपल्या असंख्य समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.बीड जिल्ह्यात राजकीय परिवर्तन घडवून काँग्रेस पक्ष सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देईल असे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे म्हणाले.अंबाजोगाईत बीड जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यावेळी ते बोलत होते.हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील व माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी मान्यवर नेत्यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.यावेळी ज्येष्ठ नेते बाबुरावजी मुंडे,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,माजी आमदार सिराजभाई देशमुख,आदित्य पाटील,राहुल सोनवणे,किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव,अभय साळुंखे (लातूर),महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिलराव मुंडे,महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, हणमंतराव मोरे,नवनाथराव थोटे,काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे,एॅड.अनंतराव जगतकर,वसंतराव मोरे,तारेखअली उस्मानी,सय्यद बहाद्दूर ऊर्फ हनिफ,पशुपतीनाथ दांगट,जुबेरभाई चाऊस,शेख नबी शेख चाँद,बाळासाहेब ठोंबरे,प्रतापराव मोरे,डॉ.इद्रिसभाई, कविताताई कराड,सुबराव सोळंके,नगरसेवक असेफोद्दीन बाबा खतीब,संजयराव देशमुख,विजयकाका देशमुख,संजयराव काळे,ईश्वर शिंदे,गणेश गंगणे,अशोक देशमुख,शंभूराजे देशमुख,विनोद निंबाळकर,प्रशांत आचार्य,पांडुरंग देशपांडे,बाळासाहेब जगताप आदींसह बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन ज्योती शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नारायणराव होके यांनी मानले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी बीड,गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर,माजलगाव,वडवणी,धारूर,केज,परळी,अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी,नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी.सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या