💥सणासुदीच्या काळात वारंवार खंडित वीजपुरवठ्या मुळे नागरिक हैराण..!


💥भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेतला घेराव💥

💥शहरात "अखंडित वीज पुरवठा" करणे बाबत घेतले लेखी आश्वासन💥

परळी प्रतिनिधी: गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरात विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असलेल्या नागरिक वैतागले आहेत,सध्या दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात तरी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आज परळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेराव घेऊन जाब विचारला.

    मागील अनेक दिवसांपासून शहरात सतत जाणाऱ्या विजे मुळे शहरातील नागरिक परेशान झाले असून अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर सुद्धा याचा विपरीत परिणाम झाला आहे,सध्या नवरात्र-दसरा व येणाऱ्या काळात दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसात तरी वीज पुरवठा खंडित होऊ नये ही नागरिकांची अपेक्षा आहे,याचाच  धागा पकडून आज शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेराव घेऊन सतत च्या जाणाऱ्या विजे बद्दल संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारून धारेवर चांगलेच धरले,या यावेळी आंबटकर यांनी येणाऱ्या काळात वीज खंडित होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन कार्यकर्त्याना दिले.या प्रसंगी जेष्ट नेते श्रीराम मुंडे, भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे,महादेव इटके, अश्विन मोगरकर, सचिन गित्ते,नितीन समशेट्टे, सुशील हरंगुळे,रोहिदास बनसोडे,विकास हालगे, वैजनाथ रेकने,विजय दहिवाळ, दिलीप नेहरकर,पवन तोडकरी,पवन मोदाणी,श्रीनिवास राऊत,ज्ञानेश्वर मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या