💥परभणी जिल्ह्यात मुग, उडीद आणि सोयाबीनची नाफेडच्या वतीने नोंदणी सुरु....!


💥अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी यांनी दिली आहे💥

परभणी (दि.07 आक्टोंबर) :- केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने खरीप हंगाम 2021-22 मध्ये मुग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तरी खरेदी केंद्राच्या ठिकाणी मुग, उडीद खरेदी करण्यासाठी नोंदणी दि.5 ऑक्टोबर 2021 पासून तर सोयाबीनची नोंदणी दि.15 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी यांनी दिली आहे.


           नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करावी. नोंदणीकरीता सोबत खरीप हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकाची छायांकित प्रत द्यावी   बँक पासबुकावरील शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट दिसावा. संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मुग, उडीद व सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. असेही जिल्हा पणन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या