💥सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला केले पोलीसांनी जेरबंद...!


💥अमरावती जिल्हयातील गुन्हयातील आरोपी मालेगांव पोलीसांच्या ताब्यात💥

वाशिम:-दिनांक १७/८/२०२१ रोजी ग्रांम वनोजा ता. अंजनगांव सूरजी जि.अमरावती गामीण येथून एका इसमाने अल्पवयीन बालीकेस पळून नेले होते त्या संदर्भाने पो.स्टै रहिमापूर जि अमरावती येथे अप नंबर १७७/२०२१ कलम ३६३ भा.द. वी. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी हा पिडीत हिस घेवून घटनेपासून फरार होता.

सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर गुन्हयातील पिडीत बालीका व आरोपी मालेगांव येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पो.स्टै. रहिमापूर जि.अमरावती ग्रामीण येथील पो.स्टॉप पोहेकॉ जउळकर ब.न.९१९ पोकॉ उमेश ब.न. ९७३

मपोका सूजाता ब.न.५८१ हे मालेगांव पो.स्टे. ला येवून सदर गुन्हयातील आरोपी व पिडीत बालीका यांचा शोध घेणे कामी तपासकामी पोलीस मदत मागीतली असता पोलीस स्टेशनचे

पोलीस निरीक्षक प्रवीण धूमाळ यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे पोलीस स्टेशन मधून पोहेकॉ कैलास कोकाटे ब.न. ६९२ डायव्हर पोकॉ विजय ब.न ९९१ यांना सदर तपास पथका सोबत

आरोपी व पिडीत यांचा शोध घेणे कामी मालेगांव टाउन मध्ये रवाना केले सदर गुन्हयातील नमूद आरोपी व पिडीत मूलीचा कोणताही फोटो अगर माहिती नसून सूध्दा सदर तपास पथक

व मालेगांव पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाउन माहिती काढली असता नमूद आरोपी हा पोलीसांचा सुगावा लागल्याने घराचे छतावर जाउन पळून जाउ लागला असता त्याचा नमूद पोलीस कर्मचारी यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास पकडले व त्यास पिडीत मूलीबाबत विचारणा करून त्याने सांगीतल्या प्रमाणे दूस या ठिकाणचे घरून सदर पिडीत मूलीस ताब्यात घेतले व त्यांना पोलीस स्टेशनला आणून पूढिल कार्यवाही करणे कामी

पो.स्टे. रहिमापूर जि. अमरावती ग्रामीण येथील पथकाचे ताब्यात दिले.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे साहेब मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे

साहेब व पो.नि.प्रवीण धुमाळ पो.स्टे.मालेगांव यांचे मार्गदर्शना मध्ये पोहेकॉ.कैलास कोकाटे ब.

नं.६९२ , डापोना.विजय डोईफोडे ब.नं.९९१ यांनी पार पाडली आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या