💥कर्णपुरा देवी नवरात्र उत्सवास प्रारंभ संस्थापक अध्यक्ष आ. दानवे यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने महाआरती घटस्थापना...!


💥ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कर्णपुरा देवीची आज सकाळी सनई चौघड्यांच्या निनादात झाली महाआरती💥                                         

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद : आजपासून नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून या आनंददायी उत्सवाची आज पहिली माळ. संभाजीनगरचे अराध्य दैवत ,ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कर्णपुरा देवीची आज सकाळी  सनई चौघड्यांच्या निनादात, भक्तिमय वातावरणात महाआरती व पारंपारिक पद्धतीने घटस्थापना कर्णपुरा देवी नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना प्रवक्ते , जिल्हाप्रमुख,आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आली.


यावेळी बोलताना कर्णपुरा देवी नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ,शिवसेना प्रवक्ते, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की मागील पावणेदोन वर्षांपासून भाविकांसाठी मंदिरे बंद होती covid-19 चा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्यक्ष मंदिर उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे महाविकास आघाडीचे सरकार चे मनापासून आभार .

आज घटस्थापनेने नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होतो.नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती देवतेची पूजा, शक्ती आणि भक्ती च्या जोरावर कोरोना, अतिवृष्टी  या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती भक्तांना देवो, तसेच येणाऱ्या काळात गरबा, दांडिया खेळण्यास सुद्धा सरकार टप्प्याटप्प्याने परवानगी देतील आपणही थोडासा धीर आणि संयम बाळगला पाहिजे शेवटी दांडिया, गरबा खेळण्यापेक्षा प्रत्येकाच्या जीव महत्त्वाचा आहे, नागरिकांच्या जीवाचा प्रश्न महत्त्वाचा आहे नागरिक ही नियमांचे पालन करत आहे यापुढेही करतील आणि नागरिकांनी ही देवीच्या दर्शनाला येताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन याप्रसंगी आमदार अंबादास दानवे यांनी केले.

याप्रसंगी नवरात्र उत्सव समितीचे संतोष दानवे, संतोष मरमट राजू दानवे राजू राजपूत अभिजीत पगारे पराग कुंडलवाल लक्ष्मण बताडे जगन्नाथ दानवे पोपट दानवे सर्जेराव दानवे अंकुश दानवे सुरेश दानवे आकाश दानवे धर्मराज दानवे शुभम दानवे संतोष भाकडे रोहित दानवे बाळू दानवे बंटी दानवे सुमित दानवे अजय दानवे रमेश दानवे निखील दानवे नंदू लबडे बद्रीनाथ ठोंबरे वेदांत हरसुलकर हिरालाल बिरुटे संजय बारवाल सुनिता आऊलवार, अरुणा भाटी आदी भाविक भक्तगण उपस्थित होते.....

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या