💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे कोरोना लसीकरणाचा जागर...!


💥ताडकळस वासियांना तसेच परिसरातील नागरिकांना को व्हॅक्सिंन व कोविलशील्ड लसीचे लसीकरण करण्यात आले💥

पूर्णा ; तालुक्यातील ताडकळस येथे उपजिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजल्यापासून ते थेट संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत ताडकळस वासियांना तसेच परिसरातील नागरिकांना को व्हॅक्सिंन व कोविलशील्ड लसीचे लसीकरण करण्यात आले.


परभणी जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी,पूर्णा तसेच स्थानिक आरोग्य कर्मचारी व पोलीस प्रशासन,राजनीतिक पुढारी, समाज सेवक व पत्रकार यांच्या सहकार्याने अथक परिश्रम करून गावातील गल्लो गल्ली व थेट डोअर टू डोअर प्रत्यक्ष भेटून नागरिकांचे लसीकरण करून घेतले . तसेच गावातील व्यापारी वर्ग यांच्या लसीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले तर प्राथमिक आरोग्य केंद्र समोर ही कॅम्प लावून मेंन रस्त्यावरील वाहने थांबवून असे एकंदरीत 700 च्या वर नागरिकांचे लसीकरण करून घेतले त्यांचा मानस 1000 नागरिकांचे लसीकरण करण्याचा होता.

जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती असल्यामुळे ताडकळस येथील शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा ताई व आरोग्य कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या कार्याचे जनतेमधून कौतुक होत आहे तेव्हा जनतेमधून एकच उद्‍गार निघत आहे, "अधिकारी असावा तर असा" यावेळी जिल्ह्याचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळसचे अधिकारी शिक्षक वर्ग , अंगणवाडी सेविका , आशाताई,राजनेतिक पुढारी,समाजसेवक व पत्रकार बांधव यांचे विशेष सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या