💥लखीमपुर घटनेचा अनु. जाती काँग्रेसतर्फे जाहीर निषेध....!


💥उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा - ॲड.संजय रोडे

परळी ; उत्तर प्रदेशातील लखीमपुरची घटना ही देशाला शर्मसार करणारी असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा व मृतकांच्या  कुटुंबांना प्रत्येकी वीस लाख रुपयांची आर्थिक मदत झाली पाहिजे अशी मागणी परळी शहर अनुसूचित जाती काँग्रेस चे अध्यक्ष ॲड. संजय रोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी या मृतकांच्या कुटुंबाना भेटावयास जात असताना त्यांच्यासोबत पोलिसांनी जो गैर कायदेशीर व्यवहार केला आहे त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून बेकायदेशीर अटक करण्यात आली.ही घटना म्हणजे  योगी आदित्यनाथ यांची हुकुमशाही आहे.  लखीमपुर घटनेचा परळी शहर अनुसूचित जाती काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून गाडी अंगावर घालणार्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

     उत्तर प्रदेशात भाजपाचे गुंडाराज चालत असून तेथे अराजकता माजली आहे. तरी महामहीम राष्ट्रपती महोदयांनी  उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावून तेथे कायदा व सुव्यवस्था स्थापित करण्याची मागणीही ॲड. संजय रोडे यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या